IMD Alert : एप्रिल महिना सुरु झाला असून देशातील अनेक भागात या महिन्यामध्ये उष्णतेत वाढ होताना दिसते. मात्र यंदा हवामान बदलामुळे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. हवामानात बदल झाल्याने अनेक राज्यांमध्ये माउसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याकडून येत्या २४ तासांमध्ये १० राज्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदल पाहायला मिळत आहे.
१ एप्रिलपासून अनेक राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दिल्लीतील हवामानात बदल
आज दिल्लीमधील किमान तापमान 19 अंश तर कमाल तापमान 32 अंश नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्लीतील काही भागात हलका आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात देखील घट होऊ शकते.
येत्या २४ तासांत वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगाल आणि देशाच्या अनेक भागात दिसणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये बदल दिसून येतील.
भारतीय हवामान खात्याने बिहार, झारखंडसह अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
त्यामुळे तापमानात मोठा बदल होणार आहे. जर आपण मध्य प्रदेशबद्दल बोललो, तर 3 एप्रिल रोजी सक्रिय होणार्या मजबूत वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या अनुपस्थितीत, पावसाची शक्यता कमी आहे, परंतु आकाश सतत ढगाळ आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये हवामान आल्हाददायक असेल.
यासोबतच आज जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंडसह हिमाचलच्या अनेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. लवकरच अनेक भागातील उष्णतेत देखील वाढण्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे.