IMD Alert Today : काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे तर आता भारतीय हवामान विभागाने 17 मार्चपर्यंत दिल्लीसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा तसेच पर्वतांवर बर्फवृष्टी आणि गडगडाटी वादळाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस बिहार आणि झारखंडसह 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये उष्मा वाढत आहे.
मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात पावसाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. पुढील 24 तासांत झारखंड,ओडिशा , पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकसह आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराममध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानशास्त्रानुसार, 12 मार्च रोजी झारखंडचा दक्षिण भाग म्हणजे पूर्व सिंघभूम, पश्चिम सिंघभूम, सिमडेगा, सरायकेला अंशतः ढगाळ राहील 13 आणि 14 मार्चला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. झारखंडमधील रांचीमध्ये 17 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांत ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण तामिळनाडू, केरळ, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह ओडिशा हिमाचल, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची नोंद होऊ शकते. 12 मार्च ते 17 मार्च या कालावधीत पश्चिम हिमालयात पावसाची क्रिया सुरू होईल. 13 ते 17 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयातील अनेक भागात जोरदार हिमवृष्टीचा इशाराही जारी करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस वायव्य आणि मध्य भागात कमाल तापमानात वाढ होईल, त्यानंतर पुन्हा एकदा या तापमानात घट होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. पश्चिम हिमालयावरील वेस्टर्न डिस्टर्बन्स आजपासून सक्रिय होणार आहे. त्यामुळे 12, 13 आणि 14 मार्च रोजी या भागात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर सखल भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक भागात जोरदार हिमवृष्टीमुळे हवामानावर परिणाम होणार आहे. त्याच वाहतूक सेवेवरही परिणाम होऊ शकतो.
उत्तराखंडमधील 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि गारपिटीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 17 मार्च, मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय 35 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या भागात बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
हिमाचलमध्ये 15 मार्चपासून वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 3 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला मंडी आणि कुल्लू जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 16 तारखेपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय राहील. त्यामुळे शिमला मंडी आणि कुल्लूमध्ये 72 तासांत मुसळधार वादळाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला होता. उंच भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 17 मार्चपर्यंत असेच वातावरण राहील. यासोबतच हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
हे पण वाचा :- Relationship Tips 2023: रिलेशनशिपमध्ये तुम्ही ‘ह्या’ 5 चुका करत असाल तर सावधान ! नाहीतर होणार ..