भारत

IMD Rainfall Alert : महाराष्ट्रासह 18 राज्यांमध्ये पाऊस-वादळासह गारपिटीचा इशारा ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rainfall Alert :  काही दिवसात मे 2023 सुरु होणार आहे मात्र तरीही देखील महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात आता कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.

यातच भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील तब्बल 18 राज्यांना पाऊस-वादळासह गारपिटीचा इशारा दिला आहे.

विभागाने आज देशातलं बहुतेक भागात ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा दिला आहे.यातच आम्ही तुम्हाला सांगतो उद्या आणि परवा म्हणजेच शुक्रवार-शनिवारी देशाच्या बहुतांश वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

29 एप्रिलपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे ज्यामुळे 3 मे पर्यंत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो आणि जोरदार वारे देखील अपेक्षित आहेत आणि तापमानात घट होऊ शकते.

18 राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटनुसार, आज विदर्भ, मराठवाडा, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, केरळ आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

दुसरीकडे, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह गारपीट होऊ शकते.

संपूर्ण आठवड्याची स्थिती

पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.

केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व भारतातही पुढील चार दिवस देशाच्या या भागात पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे.

या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. आज महाराष्ट्र,  कर्नाटक, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गारपीट होऊ शकते. पुढील तीन दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :-  Vastu Tips: घरात ‘या’ 5 ठिकाणी चुकूनही तुळशीचा रोप ठेवू नका नाहीतर व्हाल कंगाल

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts