IMD Rainfall Alert : देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे.
यामुळे देशातील हवामान झपाट्याने बदलत आहे. यातच आता हवामान विभागाने मोचा चक्रीवादळामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
तर विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही राज्यात उद्यापासून पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रासह दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचा वेग हळूहळू वाढणार आहे. त्याचा परिणाम अंदमान निकोबारमध्ये दिसून येईल.
चेतावणी जारी करताना हवामान खात्याने म्हटले आहे की, “8 ते 12 मे दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. यापैकी 8, 9 आणि 12 मे रोजी पावसाचा वेग खूप वाढणार आहे. त्याच वेळी, बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांवर 40-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, ज्याचा वेग हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारताच्या हवामानाबाबत बोलायचे झाले तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली येथे 7 आणि 8 मे रोजी पाऊस पडेल. तिकडे पश्चिम उत्तर प्रदेशात 7 मे रोजी पावसाची शक्यता आहे. याशिवाय 7 आणि 8 मे रोजी उत्तराखंडमध्ये गारपीट होईल. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये 7 मे रोजी गारा पडतील.
दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल येथे पुढील पाच दिवस पाऊस पडेल. यामध्ये तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे 7 मे रोजी, तर केरळमध्ये 9 ते 11 मे दरम्यान पाऊस पडेल तर दक्षिण कर्नाटकात 10 आणि 11 मे रोजी मुसळधार पाऊस पडेल.
ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाले तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात पुढील पाच दिवस पाऊस पडणार आहे. देशातील बहुतांश भागात पाच दिवस कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यानुसार उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मात्र पुढील पाच दिवस कुठेही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला नाही.
हे पण वाचा :- PAN Card Rules : पॅन कार्डधारकांनो ‘हे’ काम तात्काळ पूर्ण करा, नाहीत 6 महिने तुरुंगात जावे लागणार