IMD Weather Update : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. तरीही अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाचा फटका देशातील बहुतांश राज्यांना बसला आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजूनही मुसळधार पावसाचे सत्र सुरुच आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे फळबागा, गहू आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आता भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ५ दिवस अनेक राज्यातील हवामान खराब राहणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 15 ते 22 एप्रिल दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
15 ते 22 एप्रिल दरम्यान अनेक राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेश व्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेश 22 एप्रिलपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
6 वर्षांत प्रथमच एप्रिल महिन्यात उष्णता कमी आहे
एप्रिल महिना सुरु आहे. या महिन्यामध्ये उष्णता खूप असते. पण ६ वर्षात पहिल्यांदाच कमी उष्णतेची नोंद करण्यात आली आहे. अनेक भागात पाऊस कोसळत असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये ६ वर्षात पहिल्यांदाच या एप्रिल महिन्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेत वाढ झाली आहे. तर काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.
महाराष्ट्रासह या राज्यांना पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे बैतूल, हरदा, छिंदवाडा, सिवनी, मांडला, बालाघाट, खंडवा, खरगोन, बरवानी येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.