मुंबई : आज मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉकयार्ड (Mazgaon Dockyard) येथे दोन स्वदेशी युद्धनौका दाखल होणार असून आजचा दिवस युद्धनौका (Warship) क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) स्वतः तेथे उपस्थित राहणार आहेत.
INS सूरत (यार्ड 12707) आणि INS उदयगिरी (यार्ड 12652) या युद्धनौकांद्वारे भारतीय हवाई दल (Indian Air Force) आपले सागरी पराक्रम संपूर्ण जगाला दाखवणार आहे. याबाबतची दोन्ही युद्धनौकांची रचना नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने केली आहे.
दोन्ही युद्धनौका स्टेल्थ गाईडेड मिसाईल नाशक आहेत
फ्रंटलाइन युद्धनौका ‘सुरत’ (प्रोजेक्ट 15B डिस्ट्रॉयर) आणि ‘उदयगिरी’ (प्रोजेक्ट 17A फ्रिगेट) पुढील पिढीतील स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आहेत. INS सुरत हे प्रोजेक्ट 15B चे चौथे फ्रिगेट आहे आणि प्रोजेक्ट 15A म्हणजेच कोलकाता-श्रेणीच्या विनाशकारी युद्धनौकेवर एक मोठा बदल आहे.
सुरत ही युद्धनौका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून बांधली गेली आहे आणि गुजरातची व्यावसायिक राजधानी असलेल्या सुरतच्या नावावरून तिचे नाव देण्यात आले आहे. मुंबईनंतर सुरत हे पश्चिम भारतातील दुसरे मोठे व्यावसायिक केंद्र मानले जाते.
‘उदयगिरी’ या युद्धनौकेची वैशिष्ट्ये
आंध्र प्रदेशातील पर्वतराजींच्या नावावरून ‘उदयगिरी’ (फ्रिजेट) ही युद्धनौका, प्रोजेक्ट 17A फ्रिगेट्स अंतर्गत तिसरे जहाज आहे. हे प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीने सुसज्ज आहे. १८ फेब्रुवारी १९७६ ते २४ ऑगस्ट २००७ या तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या उदयगिरी या युद्धनौकेच्या मागील आवृत्तीचा हा आणखी एक प्रकार आहे.
सध्या ५० हून अधिक जहाजे आणि पाणबुड्या तयार केल्या जात आहेत
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या ५० हून अधिक जहाजे आणि पाणबुड्यांचे बांधकाम सुरू आहे आणि भारतीय नौदलाकडे आधीच सुमारे १५० जहाजे आणि पाणबुड्या आहेत.
स्वावलंबनावर बोलताना भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी डिसेंबर २०२१ मध्ये सांगितले की, गेल्या सात वर्षांत नौदलातील सर्व २८ जहाजे आणि पाणबुड्या भारताने बांधल्या आहेत.