भारत

Indian Railway : ‘हे’ झाकण नसेल तर प्रवास होईल अशक्य ! ट्रेनच्या डब्यांवर असलेली झाकणे काय काम करतात? जाणून घ्या

Indian Railway : भारतात वाहणूकीचे सर्वात मोठे साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. तुम्हीही रेल्वेने प्रवास केला असते. जर दररोजचा विचार केला तर देशात लाखो संख्येने लोक या मार्गाने प्रवास करत असतात.

अशा वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यांच्या वर एक लहान आवरण हे तुम्ही पाहिले असेल. हे पाहून तुम्हाला नक्कीच वाटले असेल की हे झाकण सर्व ट्रेनच्या डब्यात का बसवले गेले आहे? आणि ते काय काम करते. आज आपण हेच जाणून घेणार आहे की या झाकणाचे रेल्वेमध्ये काम काम असते.

ट्रेनच्या डब्यांवर लावलेल्या या गोल झाकणांना रूफ व्हेंटिलेटर म्हणतात. ट्रेनच्या डब्यातील उष्णता बाहेर काढण्यासाठी या विशेष प्लेट्स किंवा गोल कॅप्स ट्रेनच्या छतावर लावल्या जातात, कारण ट्रेनमध्ये दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. डब्याच्या आतील बाजूस जाळी असल्याचे तुम्ही पाहिले असेल.

त्यांच्याशिवाय हा प्रवास खूप कठीण असेल.

वास्तविक, जेव्हा ट्रेनच्या डब्यात प्रवाशांची संख्या वाढते, त्या वेळी ट्रेनमध्ये उष्णता अधिक वाढते. या उष्णता आणि गुदमरल्यामुळं निर्माण होणारी वाफ बाहेर काढण्यासाठी ट्रेनच्या डब्यात ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसे न केल्यास प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करणे कठीण होणार आहे. हे लोकांना जास्त उष्णता आणि गुदमरल्यापासून वाचवण्याचे काम करते.

रूफ व्हेंटिलेटर कसे काम करतात?

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की ट्रेनच्या आतल्या छतावर जाळी असते. काही डब्यांमध्ये जाळ्यांऐवजी कोचमध्ये गोल छिद्रे आहेत. ही जाळी ट्रेनच्या वरच्या प्लेट्सला जोडलेली असते.

ट्रेनमधील हवा किंवा उष्णता त्यांच्यामधून जाते कारण गरम हवा नेहमी वरच्या दिशेने जाते. ही गरम हवा बाहेरील बाजूस ठेवलेल्या छतावरील व्हेंटिलेटरद्वारे कोचच्या आतल्या वेंट्स किंवा ग्रिलमधून बाहेर काढली जाते.

म्हणून छतावरील व्हेंटिलेटरवर प्लेट्स वापरल्या जातात

छताच्या व्हेंटिलेटरच्या वर एक गोल किंवा इतर कोणत्याही आकाराची प्लेट ठेवली जाते, जी दूरवरून ट्रेनच्या छतावर गोल झाकणासारखी दिसते. डब्याच्या आतील गरम हवा छताच्या व्हेंटिलेटरमधून बाहेर पडावी म्हणून ही प्लेट बसवण्यात आली आहे, पण पाऊस पडल्यावर बाहेरचे पाणी डब्याच्या आत येत नाही. अशा प्रकारे या व्हेंटिलेटरवर प्लेट्स काम करत असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts