Mahindra Thar : महिंद्रा कंपनीच्या अनेक कार भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवत आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. मात्र आता थार प्रेमींना महागाईचा मोठा झटका बसला आहे. थार खरेदी करणे महागले आहे.
2023 मध्ये महिंद्राने SUV ची रियर-व्हील-ड्राइव्ह थार कार लॉन्च केली होती. कंपनीने ही कार ३ प्रकारांमध्ये लॉन्च केली केली होती. त्यावेळी त्यांची किंमत कमी होती. मात्र आता किंमत वाढवण्यात आली आहे.
AX डिझेल, LX डिझेल आणि LX पेट्रोल, ज्याची किंमत 9.99 लाख ते 13.49 लाख रुपये आहे. पहिल्या १० हजार ग्राहकांसाठी या किमती लागू होत्या. मात्र आता महिंद्रा कंपनीने LX डिझेल मॅन्युअल व्हेरियंटची किंमत 50,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
आता जर तुम्हाला थार कारखरेदी करायची असेल तर तुम्हाला 11.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीने खरेदी करावी लागेल. 11.49 लाख रुपये ही एक्स-शोरूम किंमत आहे यामध्ये तुम्हाला आणखी काही पैसे खरेदीसाठी जमा करावे लागतील.
कंपनीकडून सुरुवातील LX डिझेल मॅन्युअल व्हेरियंट कार 10.99 लाख रुपये किमतीमध्ये लॉन्च करण्यात आली होती. मात्र आता ग्राहकांना 11.49 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
महिंद्रा थार रिअर-व्हील-ड्राइव्हच्या किमती
— AX (O) डिझेल – 9.99 लाख रुपये
— LX डिझेल – 11.49 लाख रुपये (पूर्वी 10.99 लाख रुपये)
— LX पेट्रोल AT – 13.49 लाख रुपये
महिंद्रा थार RWD आवृत्ती एव्हरेस्ट व्हाईट आणि ब्लेझिंग ब्रॉन्झ या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून ही कार 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिनसह देण्यात आली आहे. कमी उर्जा असलेले डिझेल इंजिन थर RWD ला उप-4 मीटर वाहनांवर GST लाभांच्या कक्षेत आणते. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, हे इंजिन 117bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते.
त्याचा टर्बो पेट्रोल RWD प्रकार फक्त 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतो. 2L टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन 150PS आणि 320Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
थार RWD वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांच्या बाबतीत, थार RWD ला पॉवर्ड ORVM, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ऑल-टेरेन टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील मिळतात.