IPL 2023 : आयपीएल २०२३ च्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. २०२३ च्या आयपीएलमध्ये अनके विदेशी आणि भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला आहे. पण तेच खेळाडू फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. ज्या खेळाडूंवर जास्त पैशांची बोली लागली आहे त्याच खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे.
आयपीएलच्या १६ हंगामाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ सामने १६ व्या हंगामातील खेळले गेले आहेत. ज्या खेळाडूंवर फ्रँचायझीने मोठा खर्च करून त्यांना आपल्या संघात समाविष्ट केले होते तेच खेळाडू आता पहिल्याच सामन्यात फेल झाल्याचे दिसत आहे.
पहा खेळाडूंची यादी
कॅमेरॉन ग्रीन
कॅमेरॉन ग्रीन हा ऑस्ट्रोलियाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने या खेळाडूवर पैशांचा वर्षाव केला होता. मात्र हा खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल झाल्याचे दिसून आले.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावात 17.50 कोटींची मोठी बोली लावून कॅमेरून ग्रीनला खरेदी करण्यात आले आहे. पण पहिल्याच सामन्यात कॅमेरॉन ग्रीन हा फक्त ५ धावा करून बाद झाला. तसेच कॅमेरॉन ग्रीनने गोलंदाजीत त्याने दोन षटकात 30 धावा दिल्या.
बेन स्टोक्स
बेन स्टोक्सला यंदाच्या २०२३ च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये स्थान मिळाले आहे. बेन स्टोक्सला चेन्नई संघाकडून 16.25 कोटींची बोली लावून खरेदी करण्यात आले आहे. पहिल्याच सामन्यात बेन स्टोक्स फ्लॉप झाल्याचे दिसून आले. पहिल्या सामन्यात तो फक्त ७ धावा करून बाद झाला.
सॅम करण
पंजाब किंग्ज संघाकडून सॅम करण याला तब्बल 18.25 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. पहिल्याच सामन्यात सॅम करणने 17 चेंडूत केवळ 26 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे पंजाब किंग्जच्या चाहत्यांची निराशा झाली.
केएल राहुल
भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल राहुल याला देखील लखनौ सुपर जायंट्सने कोटींच्या घरात बोली लावून खरेदी केले आहे. मात्र पहिल्याच सामन्यात फक्त ८ धावा करत केएल राहुल बाद झाला. केएल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हा संघाचा कर्णधार देखील आहे.
हॅरी ब्रुक
इंग्लंडचा अष्टपैलू हॅरी ब्रूक उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. पण आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये हॅरी ब्रूक पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हॅरी ब्रूक 21 चेंडूत केवळ 13 धावा करून बाद झाला आहे.