Darsheel Safary : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आमिर खानच्या या चित्रपटात विद्यार्थ्यांच्या भूमिकेत ईशान म्हणजेच दर्शील सफारी दिसला होता.
दर्शील सफारीची चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली. आमिर खानचा हा चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे उलटली आहेत. पण आता ईशान मोठा झाला असून त्याचे वय २५ वर्षे आहे. सध्या सोशल मीडियावर दर्शील सफारीचे फोटो व्हायरल होत आहेत.
२५ वर्षीय दर्शील आता तरुण हँडसम बॉय दिसत आहे. तुम्हीही त्याचे आताचे फोटो पाहून त्याला ओळखू शकणार नाही. दर्शील सफारीचा आताच फोटो पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.
दर्शील सफारीचे तारे जमीन पर या चित्रपटात ईशान नाव होते. चित्रपटात ईशानने चांगली कामगिरी केली होती. चित्रपटातील ईशानचा अभिनय पाहून अनेकजण भावुक झाले होते.
तरूण वयात दर्शील सफारीने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून सर्वांनाच चकित केले. दर्शीलचा सध्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फिकट पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला अतिशय स्मार्ट बॉय दिसत आहे.
या पोस्टमध्ये दर्शीलचे एकामागून एक अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये दर्शील चॉकलेट बॉय दिसत आहे. दर्शीलचा लूक बॉलीवूडच्या कोणत्याही चॉकलेटी हिरोपेक्षा कमी नाही. हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी यावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावर कमेंट करताना म्हंटला की, ‘तुझ्याकडे पाहून अजूनही असे वाटते की तू जमिनीवर जेवढे तारे होते तितकेच प्रतिभाशाली आहेस’. तर दुसऱ्याने ‘तुला पाहिल्यानंतर ओळखू शकलो नाही’ असे लिहिले आहे. त्याच वेळी, एकाने त्याला प्रोफेसर ऑफ मनी हेस्ट आणि निक जोनास यांचे मिश्रण असल्याचे सांगितले आहे.