भारत

PNB account holder : कामाची बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता असे करावे लागणार पेमेंट

PNB account holder : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे अशा खातेधारकांसाठी आता मोठी बातमी आहे. कारण आता बँकेकडून आर्थिक व्यवहार प्रक्रियेत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना थोड्या अडचणीही सामना करावा लागेल. मात्र हा निर्णय बँकेकडून ग्राहकांच्या हितासाठीच घेतला असल्याचे बोलले जात आहे.

बँकेकडून आर्थिक व्यवहारासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता बँकेचे नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नवीन नियम 5 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत. फसव्या चेक पेमेंटपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

बँकेकडून नवीन चेक प्रणाली नियम 5 एप्रिल 2023 नंतर लागू केला जाणार आहे. यापूर्वी १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशावर पीपीएस अनिवार्य होते. मात्र, नव्या नियमानंतर ग्राहकांना आणखी सुरक्षितता मिळणार असून, त्यांची फसवणूक बऱ्याच अंशी टाळता येणार आहे.

बँकेचे म्हणणे आहे की ग्राहक चेकचे तपशील ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंगद्वारे देऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आता NPCI कडून नवीन प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

ज्यामध्ये ग्राहकांना चेक जारी करताना आवश्यक तपशील (खाते क्रमांक, चेक नंबर, चेक अल्फा कोड, जारी करण्याची तारीख, रक्कम आणि लाभार्थी) प्रदान करणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे

ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चेकबाबत ग्राहकांची कोणतीही फसवणूक होऊ नये, ग्राहकांना आर्थिक फटका बसू नये हा यामागील उद्देश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PNB ने 1 जानेवारी 2021 पासून CTS क्लिअरिंगमध्ये सादर केलेल्या 50,000 आणि त्यावरील चेकसाठी PPS सुरू केले होते.

आरबीआयने शिफारस केली होती की या सुविधेचा लाभ घेणे खातेधारकाच्या विवेकबुद्धीनुसार आहे आणि बँका 5 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या धनादेशांसाठी अनिवार्य करण्याचा विचार करू शकतात. पीपीएसमध्ये नोंदणीकृत धनादेश केवळ विवाद निराकरण यंत्रणेअंतर्गतच स्वीकारले जातील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts