Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला आहे. आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूपर्यंत वाऱ्याचा कमी दाबाचा पट्टा आज उत्तर कर्नाटकापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील अवकाळी पावसाची तीव्रता कमी होणार असल्याची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील तापमान २ ते ३ अंश डिग्री वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे पुढील २ ते ३ दिवस तापमान कमाल ३९ ते ४० डिग्री असण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाकडून आज म्हणजेच १७ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१८ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१९ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २० एप्रिल रोजी देखील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ एप्रिल रोजी देखील मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि आसपासच्या भागातील हवामान अंदाज
१७ एप्रिल म्हणजेच आज आकाश दिवसभर कोरडे राहील तसेच संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच संध्याकाळी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
१८ आणि १९ एप्रिल रोजी आकाश कोरडे असेल मात्र संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन तसेच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी देखील हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२१ एप्रिल रोजी देखील दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारी किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच आता तापमानात वाढ होणार असल्याचे देखील पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.