Mahindra Thar Discount : महिंद्रा कंपनीच्या थार कारला भारतीय नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थार कार खरेदी केली जात आहे. महिंद्राच्या ऑफ-रोडिंग एसयूव्ही कारची सर्वाधिक विक्री होत आहे.
अनेकजण थार कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत मात्र त्कारची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता थार कारवर मोठी सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही देखील थार खरेदी करू शकता.
तुम्हीही थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन हजारोंची बचत करू शकता. थार कारवर एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
भारतातील महिंद्रा कंपनीच्या सर्वात लोकप्रिय SUV पैकी थार ही एक आहे. कंपनीकडून थारवर 25,000 ते 40,000 रुपयांची सूटही दिली जात आहे. तुम्हीही थार खरेदीवर ही सूट मिळवू शकता.
या व्हेरिएंटवर सूट उपलब्ध आहे
महिंद्रा कंपनीच्या थार 4X4 पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटच्या खरेदीवर 40,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. तसेच थारवर 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. हा एक्सचेंज बोनस इतर प्रकारांवरही उपलब्ध आहे.
महिंद्र थार 4X4 चे तपशील
Mahindra Thar 4X4 म्हणजेच फोर व्हील ड्राइव्ह व्हेरियंट दोन भिन्न 2.0-लिटर mStalin टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन पर्यायासह येते. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे. त्याच वेळी, या SUV च्या रियर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये कंपनीने 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले आहे, ज्यामध्ये फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.
महिंद्र थार 4X4 वैशिष्ट्ये
महिंद्रा कंपनीची थार कार ही एक ऑफ रोडिंग SUV कार आहे. या कारमध्ये क्रुझ कंट्रोल, हॅलोजन हेडलॅम्प्स, व्हील माउंटेड स्टीयरिंग कंट्रोल्स, ऑटो एसी फीचरसह इंफोटेनमेंट सिस्टमसह अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी यासारख्या अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
किंमत
महिंद्रा थारच्य वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत ही वेगवेगळी आहे. Mahindra Thar 4X4 एक्स-शोरूम दिल्लीतील किंमत 9.99 लाख रुपये बेस मॉडेल आहे. तर टॉप मॉडेल एक्स शोरूम किंमत 16.49 लाख रुपये आहे.