भारत

Income Tax : ३१ मार्च कर भरण्याची शेवटची तारीख ! कर वाचवण्याचे हे आहेत जबरदस्त मार्ग…

Income Tax : ३१ मार्च ही कर भरण्याची शेवटची तारीख असते. त्यामुळे या तारखेच्या आत अनेकांना कर भरणे अनिवार्य आहे. अन्यथा दंड आकारला जातो. अनेकांना कर भरत असताना सूट मिळवायची असते.

कोणी भाड्याच्या घरात राहत असते तर कोणी गृहकर्ज घेतलेले असते तर कुणी पालकांच्या घरात राहत असते. या सर्वांना कार भरताना त्यांचा टॅक्स वाचवायचा असतो. आज तुम्हाला कर कसा वाचवता येईल याबद्दल सांगणार आहोत.

एचआरए म्हणजे काय आणि कर कसा वाचवता येईल याबद्दल जाणून घेऊया. HRA म्हणजे घरभाडे भत्ता. म्हणजेच कंपनीकडून कर्मचार्‍यांना घरभाडे म्हणून दिलेला भत्ता. प्रत्येक खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्याला एचआरए मिळते.

तो फक्त तुमच्या CTC चा एक भाग आहे. परंतु हा एचआरए कर सूट अंतर्गत येतो, ज्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होतो. तुम्हाला आयकर कलम 10 (13A) अंतर्गत HRA मध्ये सूट मिळू शकते. जर एचआरएचा दावा करायचा असेल तर पगारात फक्त मूळ वेतन आणि महागाई भत्ता जोडला जातो.

गृहकर्ज घेतले असेल तर?

घर खरेदी करण्यासाठी अनेकजण सरकारी आणि खाजगी कर्मचारी गृहकर्ज घेत असतात. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, गृहकर्जाच्या बाबतीत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या मूळ पेमेंटसाठी सूट मिळू शकते.

तसेच, तुम्ही गृहकर्जावर भरत असलेल्या व्याजाच्या कलम 24B अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सूट मिळते. म्हणजेच तुम्हाला 3.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते. संयुक्त गृहकर्जाच्या बाबतीत, स्वतंत्र कर सूट मिळेल. यासाठी तुम्हाला सर्व संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील.

भाडे १ लाखापेक्षा जास्त असेल तर…

तुम्ही भाड्याने राहत असाल आणि दरवर्षी एक लाख रुपये भाडे द्या. अशा परिस्थितीत, तुम्ही भाड्याची पावती सबमिट करून 1 लाख रुपयांपर्यंतच्या सूटचा दावा करू शकता.

यासोबतच तुम्हाला आयकर अधिकाऱ्यांकडे भाडे करार सादर करावा लागेल. घरमालकाचे पॅनकार्डही दिले असल्यास भाड्याची रक्कम घरमालकाच्या उत्पन्नात जोडली जाईल. मग त्यावरही कर लागेल.

पालकांच्या घरात राहण्यावर कर सूट कशी मिळवायची

जर तुम्ही काम करत असताना पालकांच्या घरात राहत असाल तर दरमहा भाडे भरून कर वाचवू शकता. जर याचा लाभ घेईचा असेल तर तुम्हाला तुमच्या पालकांचा पॅन क्रमांक फॉर्ममध्ये भरावा लागेल.

तसेच तुम्ही भारत असलेल्या भाड्याची प्रतही तुम्हाला त्यासोबत जोडावी लागेल. तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. तुम्ही दिलेले भाडे पालकांच्या उत्पन्नात जमा होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Income Tax

Recent Posts