7th Pay Commission : आजपासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरच गोड बातमी दिली जाऊ शकते. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ केली जाण्याची घोषणा होऊ शकते.
केंद्र सरकारकडून नवीन वर्षामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही. आता लवकरच देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकारकडून महागाई भत्ता आणि डिअरनेस रिलीफ वाढीची भेट मिळू शकते.
२४ मार्च रोजी केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाऊ शकते. २४ मार्च रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सरकारकडून DA वाढीची घोषणा केली जाऊ शकते.
कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो. जर कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढवला गेला तर त्यांच्या पगारात देखील चांगली वाढ होणार आहे.
गेल्या काही वर्षाच्या नोंदी पाहिल्या तर केंद्र सरकारकडून मार्च महिन्यामध्ये DA वाढीच्या घोषणा केलेल्या पाहायला मिळतील. 2019, 2021 आणि 2022 या वर्षांमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीए वाढीला मंजुरी देण्यात आली होती. तसेच यंदाही मार्च महिन्यात DA वाढीची घोषणा होऊ शकते.
केंद्रीय मंत्रिमंडळाची १ मार्च २०२३ रोजी एक बैठक झाली होती. या बठकीमध्ये DA वाढीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आता २९ मार्च रोजी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
मार्च महिन्यामध्ये जरी कर्मचाऱ्यांच्या DA वाढीस मान्यता मिळाली तरीही कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ रोजी पासून DA वाढ मिळणार आहे. पाठीमागील दोन महिन्याची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना दिली जाईल.
महागाई भत्ता ३८ वरून ४२ टक्के होईल
केंद्रीय कर्मचाऱ्यांना (7वा वेतन आयोग) सध्या 38 टक्के दराने डीए दिला जात आहे. त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली तर ती 42 टक्के होईल. यानंतर, 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्यांसाठी वार्षिक महागाई भत्ता वाढून 90,720 रुपये होईल.
सध्याच्या महागाई भत्त्यातील फरकाबाबत बोलायचे झाले तर, पगारात दरमहा ७२० रुपये आणि वार्षिक ८६४० रुपयांची वाढ होईल. त्याचवेळी 56900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे वार्षिक आधारावर पगारात 27312 रुपयांनी वाढ होईल.