India News :काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय शिबिर आजपासून जयपूरमध्ये सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध घडमोडी आणि निर्णयांमुळे शिबिर गाजत आहे. शिबिराचे नाव बदलण्यात आले, काही घाडसी निर्णय घेण्यात आले एवढेच नाही तर चर्चेसाठी नेमलेल्या समितीतील नेत्यांना बैठकीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंद करण्यात आली आहे.
उदयपूरमध्ये होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिराला नेहमीप्रमाणे चिंतन शिबिर नाव देण्यात आले होते. मात्र, नंतर नावातून चिंतन शब्द हटवण्यात आला. त्याऐवजी नवसंकल्प शिबिर असे नाव देण्यात आले. जणू मागील सर्व विसरून पुढील वाटचालीसाठी पक्ष सज्ज होत असल्याचा संदेश द्यायचा प्रयत्न असावा.
शिबिरात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सहा समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, समितीच्या सदस्यांना चर्चेच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हॉलच्या बाहेरच सर्वांचे मोबाईल काढून घेतले जाणार आहे.
चर्चेत व्यत्यय नको आणि नंतर यातील काही मुद्दे बाहेर येऊन वाद नको, यासाठी ही दक्षता घेतल्याचे दिसून येते. याशिबिराच्या निमित्ताने काही निर्णयही होत आहेत. एक व्यक्ती एका पदावर जास्तीत जास्त पाच वर्षे राहू शकणार,
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पक्षाची उमेदवारी मिळणार, परिवारातल्या सदस्याला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी किमान पाच वर्षे पक्षाचे काम करणे आवश्यक. पक्षात सर्व समित्यांवर ३५ ते ५० वयोगटातील तरुण सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक. असे काही निर्णय होत आहेत.