भारत

मोदी सरकारचा मोठा निणर्य ! ‘त्या’ प्रकरणात स्मार्टफोनबाबत उचलले ‘हे’ पाऊल । Modi Government

Modi Government : मोदी सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मोदी सरकार डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आता लोकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहे.

यामुळे आता सरकारने मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठा निर्णय घेत प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स अनइंस्टॉल करण्यासाठी ऑप्शन देण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टममधील प्रमुख अपडेट्सची स्क्रीनिंगही केली जाणार आहे.

सरकारच्या या निर्णयाचा फटका Samsung, Xiaomi, Vivo आणि Apple सारख्या कंपन्यांना बसणार आहे. या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स आहेत, जे वापरकर्ते त्यांच्या फोनमधून अनइंस्टॉल करू शकत नाहीत. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) च्या दंडानंतर, Google ने आपल्या Android ऑपरेटिंग सिस्टम आणि Google Play Store बिलिंगमध्ये भारतीय बाजारासाठी अनेक बदलांची घोषणा केली होती.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, आयटी मंत्रालय हेरगिरी आणि वापरकर्त्यांच्या डेटाच्या गैरवापराबद्दल चिंतित आहे. प्री इंस्टॉल अॅप्स कमकुवत सुरक्षा बिंदू असू शकतात. त्यामुळेच चीन किंवा कोणत्याही परकीय शक्तीने त्याचा फायदा घ्यावा असे सरकारला वाटत नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.

अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी एका सल्लागारात म्हटले होते की, देशातील सैनिकांनी चिनी मोबाईल फोन वापरू नये. सैनिकांच्या कुटुंबीयांनाही चायनीज फोन न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी सर्व संरक्षण युनिट्स आणि फॉर्मेशन्सना त्यांच्या जवानांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर आढळल्याची प्रकरणे समोर आल्यामुळे ही सूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चायनीज मोबाईल न वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हे पण वाचा :- .. म्हणून लग्नानंतरही स्त्रिया दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात ! कारण जाणून उडतील तुमचे होश । Reason Of Extra Marital Affairs

Ahmednagarlive24 Office

Recent Posts