Modi Government Scheme : केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सादर करत आहे. मोदी सरकारच्या योजनांचा देशातील अनेक नागरिक फायदा घेत आहेत. तसेच कमी पैशांमध्ये अधिक फायद्याच्या योजना सरकारकडून सादर केल्या जात आहेत.
केंद्र सरकारकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी मुद्रा योजना सुरु केली आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना फायदा होत आहे.
आता केंद्र सरकारकडून आणखी एक योजना सादर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना ज्यांनी विमा उतरवला आहे त्यांना विमा सुरक्षा कवच दिले जाते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघात विमा योजना आहे. या योजनेद्वारे जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण देते आणि वर्षानुवर्षे नूतनीकरणीय असते.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
या योजनेसाठी 18-70 वयोगटातील बचत बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात. हा विमा काढल्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये दिले जातात. तसेच अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते. योजनेमध्ये नोंद करताना आधार कार्ड हे बँक खात्यासह केवायसी असले पाहिजे.
किती रुपये भरावे लागणार?
जर तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये नोंदणी करायची असेल तर तुम्हाला वार्षिक २० रुपये कापले जातील. हे पैसे खातेदाराच्या बँक खात्यातून ‘ऑटो-डेबिट’ सुविधेद्वारे वजा केले जातील.
ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
PMSBY ची निवड करण्यासाठी ग्राहक कोणत्याही एका बँक किंवा विमा कंपनीशी संपर्क साधू शकतात.
बहुतेक नामांकित बँका ग्राहकांना इंटरनेट बँकिंगद्वारे पॉलिसीचा लाभ घेण्याची परवानगी देतात.
ग्राहकाला इंटरनेट बँकिंग खात्यात लॉग इन करून योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.