भारत

मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चालवतो ‘हे’ काळे धंदे ! दाऊदकडे किती संपत्ती आहे ?

Dawood Ibrahim Net Worth : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट 1993 आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत विशेष चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियामध्ये दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याचे बोलले जात आहे, यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला तर दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर कराचीमधल्या एका रुग्णालयात उपचार सूरु आहेत. पण त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे. दरम्यान पाकिस्तान मधील काही ज्येष्ठ पत्रकारांनी या वृत्ताला दुसरा दिला आहे. पाकिस्तानात इंटरनेट बंद आहे.

तेथे गुगल, यूट्यूब, ट्विटर सारं काही बंद झाले असल्याने पत्रकारांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, यावर पाकिस्तान सरकारकडून कोणतीच अधिकृत अपडेट हाती आलेली नाही. तेथील सरकारने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र पाकिस्तानात काल अर्थातच 17 डिसेंबर 2023 रात्रीपासून इंटरनेट बंद झाले असल्याने तिथे काहीतरी गडबड सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

खरेतर दाऊद गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला असून येथून तो जगभरात आपला अवैध धंदा चालवत आहे. मात्र पाकिस्तान सरकारने वारंवार दाऊद पाकिस्तानात नसल्याच सांगितलं आहे. यामुळे या वृत्ताने पाकिस्तान सरकारची पूर्ण किरकरी झाली असून त्यांचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे.

दरम्यान आज आपण आतंकी दुनियाचा बेताज बादशाह, डी कंपनीचा सर्वेसर्वा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ची एकूण संपत्ती किती आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच दाऊद इब्राहिम कोणकोणते काळे धंदे चालवतो हे देखील आज आपण पाहणार आहोत.

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा बेकायदेशीर धंदा जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. या अवैध धंद्यांमधून त्याने हजारो कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन आणि भाऊ अनीस हे मिळून त्याचा काळा धंदा चालवत आहेत.

एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 1980 आणि 1990 च्या दशकात दाऊद इब्राहिमने वेश्याव्यवसाय, जुगार आणि ड्रग्जच्या व्यवसायातून अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केला होता. दाऊद इब्राहिम हा डी कंपनी या जागतिक दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. त्याच्या मागावर भारत सहित जगातील अनेक देशांचे पोलीस लागलेले आहेत.

मात्र पाकिस्तान सरकारच्या छायेखाली त्याने आत्तापर्यंत जगातील अनेक देशातील पोलिसांना चकवा दिला आहे. दरम्यान ‘फोर्ब्स’ या बिझनेस मॅक्झिनमध्ये दाऊदच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम हा आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत गँगस्टर आणि आतंकवादी आहे.

या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनकडे 2015 मध्ये 6.7 अब्ज यूएस डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 55 हजार कोटी रुपये एवढी संपत्ती होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊदची पाकिस्तानात 3 आलिशान घरे आहेत. दाऊद सध्या कराचीच्या डी-13, ब्लॉक-4, क्लिफ्टनमध्ये 6,000 स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेल्या आलिशान बंगल्यात राहत असल्याचा दावा केला जात आहे.

येथे कराचीचा नो-ट्रेपास झोन आहे आणि त्यावर पाकिस्तानी रेंजर्सचा कडक पहारा असतो. दाऊदची आपल्या देशातील अनेक शहरांमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. दाऊदच्या नावावर एक हॉटेल देखील आहे, जे आता जप्त करण्यात आले आहे.

दाऊदच्या देशातील अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यात मुंबई आणि इतर शहरातील मालमत्तांचा समावेश आहे. दाऊदची दुबईमध्येही मोठी संपत्ती आहे. दाऊदकडे मुंबईत ह्युंदाई एक्सेंट सेडान कारही होती, जी सरकारने जप्त केली आहे. दाऊदचे आयपीएल स्पॉट फिक्सिंग मध्ये देखील नाव आले होते. याशिवाय दाऊदचे नाव 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात देखील समोर आले होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts