Mystery Village Of India : जगभरात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत. अशा ठिकाणाबद्दल अनेकांना जाणून घेईला किंवा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहायला खूप आवडत असते. जगभरात अशी काही ठिकाणे आहेत जी खूप रहस्यांनी भरलेली आहेत.
भारतातही अशी काही रहस्यमय ठिकाणे आहेत ज्याचा इतिहास खूप जुना आहे. तसेच अशा ठिकाणाबद्दल जाणून घेऊन लोकही खूप आश्चर्यचकित होत असतात. आज तुम्हाला भारतातील अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत जिथून स्वर्गात रस्ता जातो.
आज ज्या गावाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव माना आहे. या गावातून स्वर्गाचा मार्ग आहे असे पौराणिक मान्यतेनुसार मानले जाते. यामागे एक कथा आहे ती सर्वप्रथम जाणून घेणे गरजेचे आहे.
प्रसिद्ध गावाची गोष्ट
देशातील शेवटचे माना हे गाव आहे. हे गाव बद्रीनाथपासून ३ किमी उंचावर आहे. या गावातून स्वर्गाचा मार्ग जातो. जुन्या आणि पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की या ठिकाणाहून पांडवांनी स्वर्गाचा मार्ग निश्चित करण्यासाठी ही जागा निवडली होती.
पांडव स्वर्गात जात असताना या गावातून बाहेर पडल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर द्रौपदीही त्यावेळी त्यांच्यासोबत होती. पांडवांना शारीरिकदृष्ट्या स्वर्गात जायचे होते. या प्रवासात त्याच्यासोबत एक कुत्राही होता असे पौराणिक कथेमध्ये देखील सांगितले जाते.
या गावात भीम पूल बांधला
माना या गावात पांडवांनी बीम पूल बांधला होता. सरस्वती नदीवर याक मोठा दगड आहे. त्यालाच भीमपुल मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात तसेच दर्शन देखील घेतात. हे एक प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जे खूप आकर्षक मानले जाते.
विशेष कुंड
माना गावात एक विशेष कुंड देखील आहे, ज्याची ओळख सर्वत्र आहे. हे पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तप्त कुंड असे या कुंडाचे नाव आहे. तप्त कुंड हे अग्निदेवाचे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते. या कुंडाचे पाणी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्वचेचे आजार पाण्याच्या सेवनाने बरे होतात.
त्यामुळे या गावाबाबत आजही लोक स्वर्गाचा रस्ता आहे असे मानतात. तसेच या ठिकाणी पांडवांनी स्वर्गात जाण्याचा रस्ता निवडल्याने सर्वजण हाच स्वर्गात जायचा रस्ता आहे असे मानतात.