Narendra modi : आपल्या देशवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका हा जगभर पसरला आहे. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जागतिक बिझनेस इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने एक अहवाल दिला आहे.
यामध्ये असे दिसून आले आहे की, जवळपास नऊ वर्षे सत्तेत असूनही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. मोदींनी दिग्गजांना मागे टाकले आहे. याबाबतचा एक अहवाल नुकसान सादर करण्यात आला.
आता मोदी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत, असा अहवाल समोर आला आहे. मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या जागतिक नेत्यांना मागे टाकले आहे. यामध्ये जगातील बड्या नेत्यांचा समावेश आहे.
यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. यामुळे आता त्यांच्यावर नरेंद्र मोदी यांचे नाव लागले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू आहे.
यामुळे आता मोदी हे जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती झाले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट या बिझनेस इंटेलिजन्स कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. यामुळे भारतीयांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.