Maruti Wagonr : मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मारुती वॅगनआर आता पुन्हा एकदा नवीन रूपात फेसलिफ्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मारुती वॅगनआर कार नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध हणार आहे.
नवीन मारुती वॅगनआर कारमध्ये हायटेक फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सुसज्ज फीचर्स असणारी मारुती वॅगनआर कार आता लवकरच बी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. मारुती वॅगनआरला भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे.
मारुती वॅगनआर ही एक उत्तम फॅमिली हॅचबॅक कार आहे. कंपनीकडून या कारचे इंजिन देखील मजबूत देण्यात आले आहे. तसेच मायलेज देखील जबरदस्त असल्याने ग्राहकही चांगलेच आकर्षित होत आहेत. सध्या या कारची किंमत 5.53 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 7.41 लाख रुपये ही टॉप मॉडेलची किंमत आहे.
जपानमध्ये सादर करण्यात आलेले मॉडेल भारतात सध्याच्या वॅगनआरपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. WagonR चे सध्याचे मॉडेल भारतातील लोकांच्या मनावर राज्य करत आहे. गेल्या महिनाभरापासून ही कार बेस्ट सेलरच्या यादीतही आघाडीवर आहे.
मारुती सुझुकी कंपनीने WagonR कारची जुलै 2022 मध्ये 22,588 युनिट्सची विक्री केली आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारवर 64 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
मार्च महिना संपत आला आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष संपणार आहे. अशा परिस्थितीत कंपन्या त्यांचे लक्ष्य पूर्ण करत आहेत, त्यामुळे कारमध्ये जोरदार सूट दिली जात आहे. येथे मारुती वॅगनआरवर सर्वाधिक सूट दिली जात आहे.
इंजिन
नवीन मारुती वॅगनआर मध्ये दोन इंजिन पर्यायांसह सादर केले आहे. पहिले 1-लिटर युनिट इंजिन मिळते, जे 67PS पॉवर आणि 89Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. आणखी 1.2-लिटर युनिट इंजिन उपलब्ध आहे, जे 90PS पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
वैशिष्ट्ये
या नवीन मारुती वॅगनआर मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, चार-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स आणि 14-इंचाचे अलॉय व्हील सारखे वैशिष्ट्ये आहेत.
त्याच वेळी, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स आणि हिल-होल्ड असिस्ट सारखे फीचर्स सेफ्टी फीचर्स म्हणून देण्यात आले आहेत. सीएनजी किटचा देखील पर्याय कंपनीकडून देण्यात आला आहे.