भारत

New Rules : मोठी बातमी ! आजपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 5 नियम, होणार खिशावर परिणाम; वाचा सविस्तर

New Rules:  देशात आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे आता देशात काही नियम देखील बदलले आहे ज्याच्या परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. यापैकी काही बदल तुमच्यासाठी फायदेशीर तर काही नुकसानदायक ठरणार आहे. चला मग जाणून घेऊया देशात आजपासून कोणत्या कोणत्या नियमांत बदल करण्यात आला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल

सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यातही व्यावसायिक एलपीजीच्या दरात 172 रुपयांची कपात करण्यात आली होती.

Axis Bank Credit Card

नवीन नियम अॅक्सिस बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी एयरपोर्ट लाउंज एक्सेस प्रोग्राममध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियम 1 जूनपासून लागू झाले असून ते 31 ऑगस्टपर्यंत वैध असतील. बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना देशातील विविध विमानतळांवर कंप्लीमेंट्री लाउंज वापरण्याची सुविधा मिळते, कार्डच्या प्रकारानुसार कंप्लीमेंट्री लाउंज एक्सेसच्या संख्येवर मर्यादा आहे.

इलेक्ट्रिक टू व्हीलर घेणे महाग झाले

उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवरील सबसिडी कमी केली आहे, ज्यामुळे 21 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. अनुदान 15,000 रुपये प्रति किलोवॅट तासावरून 10,000 रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आले आहे.

EPFO नियमांमध्ये बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खात्याशी संबंधित नियमांमध्येही मोठे बदल केले आहेत, जे आजपासून लागू होणार आहेत. आता सर्व खातेदारांना पीएफ खाते आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक असेल. त्याची जबाबदारी मालकाची असेल.

100 Days 100 Payments

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 जूनपासून “100 दिवस 100 पेमेंट्स” मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, RBI 100 दिवसांच्या आत देशातील प्रत्येक जिल्ह्यात टॉप 100 अनक्लेम ठेवी शोधून निकाली काढेल.

हे पण वाचा :-  IMD Alert Today : सावध राहा, ‘या’ राज्यांना पुढील 5 दिवस झोडपणार मुसळधार पाऊस; वादळासह पावसाचा इशारा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts