No Cost EMI : तुम्ही अनेकदा कोणतीही वस्तू ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करत असताना नो कॉस्ट ईएमआय पर्याय पाहिला असेल. पण अनेकांना नो कॉस्ट ईएमआय म्हणजे काय हे माहिती नसते. अनेक लोक या नो कॉस्ट ईएमआयचा वापर देखील करत असतात.
नो कॉस्ट ईएमआय म्हणजे काय?
नो कोस्ट ईएमआय म्हणजे कोणत्याही उत्पादनाच्या EMI वर कोणतेही इतर शुल्क आकारले जाणार नाही. शून्य व्याजावर उत्पादन तुम्हाला दिले जाते. त्यालाच नो कॉस्ट ईएमआय म्हंटले जाते.
तुम्ही नो कॉस्ट ईएमआय पर्यायांमध्ये एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला फक्त त्या वास्तूचे पैसे भरावे लागतील. त्यावरील कोणतेही व्याज तुमच्याकडून आकारले जाणार नाही. काही वेळा नो कॉस्ट ईएमआयमध्ये तुम्हाला डाउनपेमेंट भरायची गरज नाही. नो कॉस्ट ईएमआयमुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
नो कॉस्ट ईएमआयचे फायदे
नो कॉस्ट ईएमआय या पर्यायांमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
१. तुम्हाला व्याज देण्याची गरज नाही.
२. तुमचे डाउन पेमेंट देण्याची गरज नाही. (काही प्रकरणांमध्ये डाऊनपेमेंट लागू होऊ शकते.)
३. उत्पादन खरेदी करणे सोपे होते.
४. तुम्हाला एकाच वेळी खूप पैसे द्यावे लागणार नाहीत.
नो कॉस्ट ईएमआय तोटे
१. नो कॉस्ट ईएमआयमुळे एखादी व्यक्ती अनावश्यक खर्च करू लागते.
२. गरज नसलेली उत्पादनेही नो कॉस्ट ईएमआयच्या लालसेने विकत घेतली जातात.
३. कधीकधी असे देखील होऊ शकते की तुम्ही जे उत्पादन खरेदी करू इच्छित आहात ते नो कॉस्ट EMI वर उपलब्ध नसेल.
नो कॉस्ट ईएमआय फायदेशीर आहे का?
तुम्हाला अनेकदा वस्तू खरेदी करायच्या असतात मात्र जास्त पैसे नसतात. त्यामुळे अनेकजण ते खरेदी करत नाहीत. पण आता नो कॉस्ट ईएमआय या पर्यायामुळे कोणतीही वस्तू कमी पैशांमध्ये खरेदी करणे शक्य आहे.
महागडी वस्तू कमी पैशांमध्ये खरेदी करता येते. तसेच उरलेल्या पैशांवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. EMI द्वारे बाकीचे पैसे तुम्ही दरमहा भरू शकता.
अनके वस्तूंवर नो कॉस्ट ईएमआय पर्याय देऊन ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो आणि कंपनीचा देखील फायदा होतो. कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढते.