Driving License : देशात वाहन चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि तुम्ही वाहन चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवणे कायद्याने गुन्हा मानला जातो. त्यामुळे वाहन चालवत असताना लायसन्स असणे आवश्यक आहे. पण आता वाहन चालवत असताना तुमच्याजवळ लायसन्स नसले तरीही पोलीस तुमच्याकडून दंड घेऊ शकणार नाहीत.
आता तुम्ही देशात कुठल्याही परिसरात विना लायसन्स वाहन चालवू शकता. कारण सरकारकडून वाहनधारकांसाठी एक नवीन योजना आणली आणली आहे. त्यामुळे वाहन चालवताना लायसन्स सोबत ठेवण्याची आता गरज नाही.
आता तुम्ही तुमचे सर्व पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या फोनवर डिजिटल स्वरूपात सेव्ह करू शकता आणि वेळ आल्यावर ते डिजिटल स्वरूपात दाखवू शकता. त्यामुळे ही कागदपत्रे सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.
डिजीलॉकरमध्ये सेव्ह करा
सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, कोणतीही व्यक्ती आपली सर्व कागदपत्रे डिजीलॉकर नावाच्या अॅपमध्ये सेव्ह करू शकते आणि ती कुठेही डिजिटल पद्धतीने दाखवू शकते. असे करणे पूर्णपणे योग्य आणि कायदेशीर आहे.
वरील सुविधेमुळे आता जरी वाहन धारक लायसन्स घरी विसरला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण डिजीलॉकरमध्ये असलेले लायसन्स तुम्ही वाहतूक पोलिसांना दाखवू शकता. हे लायसन्स सरकारद्वारे वैध ठरवण्यात आले आहे.