Good News : बऱ्याच व्यक्तींना पर्यटनासाठी भ्रमंती करण्याची हौस असते किंवा त्यांचा तो छंद असतो. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणचा अभ्यास तसेच स्थानिक वातावरण व स्थानिक चालीरीती इत्यादींचा अभ्यास असे व्यक्ती करत असतात.
भारताव्यतिरिक्त अनेक पर्यटक हे दुसऱ्या देशांमध्ये देखील फिरायला जातात. परंतु जेव्हाही दुसऱ्या देशामध्ये जावे लागते तेव्हा अनेक नियमांचे पालन आपल्याला करणे गरजेचे असते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या देशामध्ये पर्यटनासाठी किंवा फिरायला किंवा काही कामानिमित्त जरी जायचे असेल तर तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा लागतोच लागतो. याशिवाय तुम्ही विदेशामध्ये प्रवास करू शकत नाहीत.
परंतु आता काही देशांनी त्यांच्या धोरणांमध्ये थोडी शिथिलता आणली असून पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नियम शिथिल केले आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर कोरोना नंतर अर्थव्यवस्थेला मजबुती देण्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनाला चालना मिळावी म्हणून श्रीलंकेने भारत, रशिया,चीन, थायलंड, जपान आणि मलेशिया व इंडोनेशिया या सहा देशातील पर्यटकांना व्हीसा मोफत द्यायला सुरुवात केलेली आहे. अगदी याच पद्धतीचा निर्णय आता थायलंडने देखील घेतलेला आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
थायलंड फिरायला आता व्हीसाची आवश्यकता नाही
याबाबत सविस्तर वृत्त असे की, थायलंड सरकारच्या माध्यमातून भारत आणि तैवान येथील नागरिकांकरिता व्हीसाची अनिवार्यता रद्द केली असून त्यामुळे आता भारतीय नागरिकांना 30 दिवस व्हीसाशिवाय थायलंड मध्ये राहता येणार आहे व फिरता देखील येणार आहे.
कालपासून म्हणजेच एक नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे मे 2024 पर्यंत तैवान आणि भारतीय नागरिकांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. थायलंड या देशाचा विचार केला तर या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25 अब्ज डॉलर इतके योगदान पर्यटन क्षेत्राच आहे.
पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये भारत हा चौथी मोठी बाजारपेठ असल्याचे थायलंड सरकारच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे. थायलंड सरकारने टार्गेट ठेवले आहे की यावर्षी त्यांच्या देशात 2.8 कोटी पर्यटक यायला हवेत. म्हणजेच पुढच्या दोन महिन्यात 60 लाख पर्यटक थायलंडमध्ये यावेत अशी त्यांची प्लॅनिंग आहे.
सध्या जर आपण थायलंडचा विचार केला तर त्या ठिकाणाची निर्यात खूप कमी झाली आहे व त्याचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून थायलंड सरकारने पर्यटनावर फोकस केला आहे व जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता थायलंड सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील जर थायलंड मध्ये जायचे असेल तर तुम्ही नुसता पासपोर्ट असताना देखील आता 30 दिवस थायलंड फिरू शकणार आहात.