Electric Scooter : देशात दिवसेंदिवस अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा वाढू लागली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने देशातील नागरिक इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतच चालली आहे. येणाऱ्या काळात सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्रोत्साहित केले जाणार आहे. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झाली आहे.
Okaya Faast F2F असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. भारतातील इतर इलेक्ट्रिक स्कूटरशी Okaya Faast F2F ही इलेक्ट्रिक स्कूटर स्पर्धा करेल असा दावा कंपनीकडून केला जात आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दैनंदिन वापरासाठी तयार करण्यात आली आहे.
ओकाया फास्ट F2F किंमत आणि उपलब्धता
Okaya Faast F2F या इलेक्ट्रिक स्कॉउटरची किंमत 83,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 70 किमी पर्यंत धावेल. तसेच या स्कूटरचे टॉप स्पीड 55 किमी/ताशी देण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आकर्षक लुक आणि शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट या 6 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
वैशिष्ट्ये
Okaya Faast F2F स्कूटरमध्ये संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, रिमोट की, डीआरएल यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
कंपनीकडून Okaya Faast F2F 60V36Ah (2.2 kWh) लिथियम आयन-LFP बॅटरीसह लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीकडून बॅटरीला 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.
बॅटरी 800W-BLDC हब मोटरवर चार्ज प्रसारित करते. यात इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन राइडिंग मोड देखील मिळतात. हे मोड पाठवलेली एकूण शक्ती बदलतात.