Ola Electric Scooter : तुम्हालाही देशातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी आणि सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर चांगली संधी आहे. कारण आता Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त ११ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तसेच इंधनाच्या किमती देखील अधिकच वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इंधनावरील स्कूटर किंवा बाईक चालवणे न परवडण्यासारखे झाले आहे.
हेच सर्व पाहता आता ऑटो कंपन्यांनी देखील इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. ग्राहकांकडून देखील स्कूटर, कार किंवा बाईक खरेदी करताना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडला जात आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ग्राहकांच्या इंधनावरील पैशाची मोठी बचत होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यानंतर ग्राहकांना पुन्हा इंधनावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर तपशील
जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील EMI वर ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. त्यामुळे कमी डाउनपेमेंटवर तुम्ही Ola S1 Air खरेदी करू शकता. तसेच Ola S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Brand | Ola |
---|---|
Model | Ola S1 Electric Scooter |
Top Speed | 90 kmph |
Battery Capacity | 2kWh |
Battery Type | Lithium Ion |
Battery Charging Time | 4 Hours |
Riding Modes | Eco, Normal and Sport |
Transmission | Automatic |
Brakes | Disc |
Motor Type | Mid Drive IPM |
किंमत किती आहे आणि किती EMI भरावा लागेल?
Ola S1 या इलेक्ट्रिक स्कूटर बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 99999 रुपये आहे. तर टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 1.15 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन रोड किंमत सुमारे 1 लाख 8 हजार 44 रुपये आहे.
पण जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील 11,000 रुपये डाऊन पेमेंटवर ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी कुरु शकता. यानंतर तुम्हाला या स्कूटरवर 97044 वर कर्ज मिळेल. हे कर्ज तुम्हाला तीन वर्षांसाठी वार्षिक 9.7% दराने दिले जाईल.
तसेच तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज तुम्हाला दरमहा 3118 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण तुम्हाला तीन वर्षांमध्ये घेतलेल्या कर्जावर 15204 व्याज भरावे लागेल. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना आणि त्यावर कर्ज घेताना तुम्ही सर्व गोष्टी तपासून पाहा.