भारत

Pakistan Petrol Rate : आजपासून पेट्रोलच्या दरात 32 रुपयांची वाढ, महागाईत होरपळणाऱ्या नागरिकांना धक्का

Pakistan Petrol Rate : सध्या पाकिस्तानची परिस्थिती खूपच हलाखीची झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई देखील वाढली आहे. यामुळे तेथील नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. आता महागाईत होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

देशात पेट्रोलच्या दरात 32.07 रुपयांची दरवाढ होऊ शकते. त्यामुळे पेट्रोलचा दर 249.80 रुपयांहून 281.87 रुपयांवर जाऊ शकतो. यामुळे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील लेव्हीच्या माध्यमातून 850 अब्ज रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. मात्र, यामध्ये 250 अब्ज रुपयांची तूट असल्याचा अंदाज आहे.

यामुळे आता पाकिस्तान खूपच आर्थिक परिस्थिती अडकला आहे. मागील काही दिवसात इंधनात मोठी दरवाढ झाली होती. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत असून महागाईचा आगडोंब उसळला आहे. यामुळे गरिबांचे मोठे हाल सुरू आहेत.

पेट्रोलनंतर डिझेलच्या दरावरील लेव्हीत सरकारकडून 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार प्रति लिटर पेट्रोलियम लेव्ही रुपये 50 आकारत आहे. त्यावर सामान्य विक्री कर (जीएसटी) अद्याप लागू करण्यात आलेला नाही. देशात इतर वस्तू देखील महागल्या आहेत.

देशात दूध 300 रुपये लिटर चिकन 800 रुपये किलो अशा दराने विकले जात आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामुळे आता येणार काळात परिस्थिती बदलणार की अशीच राहणार हे लवकरच समजेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts