PAN Card Correction: आज पॅन कार्डच्या मदतीने बँकेत नवीन खाते उघडता येतात तर सरकारच्या अनेक योजनांचा लाभ देखील घेता येतो. मात्र कधी कधी पॅन कार्डमध्ये जन्म तारीख तसेच इतर काही चुका होतात.आम्ही तुम्हाला सांगतो पॅन कार्डमध्ये झालेल्या ह्या चुका सुधारणे खूप सोपे आहे. आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पॅन कार्डसहज अपडेट करू शकतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सर्वप्रथम NSDL च्या https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या वेबसाइटला भेट द्या.
तेथे, डाव्या बाजूला ‘Application Type’ वर जाऊन, ‘Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card’ ड्रॉप डाउनमध्ये निवडावे लागेल.
यानंतर तुमच्या पॅन कार्डची कॅटेगिरी निवडा. ज्यामध्ये वैयक्तिक पासून इतर कॅटेगिरी उपलब्ध आहेत.
तुमची कॅटेगिरी निवडल्यानंतर, अर्जदाराच्या माहिती विभागात आवश्यक माहिती फीड करा. येथे नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि विद्यमान पॅन क्रमांक भरावा लागेल.
यानंतर, खाली दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
नंतर कॅप्चा भरा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
यानंतर कॅटेगिरीनुसार शुल्क भरावे लागेल.
त्यानंतर अर्जदाराला बँक संदर्भ क्रमांक आणि व्यवहार क्रमांक मिळेल.
आता ‘Aadhaar Card’ खाली लिहिलेल्या ‘Authenticate’ बॉक्सवर क्लिक करा.
त्यानंतर ई-केवायसी नंतर ‘Continue with e-Sign’ वर क्लिक करा आणि ओटीपी जनरेट करा.
यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे अर्जदाराला त्याचा/तिचा फॉर्म PDF स्वरूपात मिळेल. यानंतर पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर हा फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला पॅन कार्ड अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल. पॅन अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही परदेशात रहात असाल तर तुम्हाला या कामासाठी 1020 रुपये फी भरावी लागेल. तुम्ही हे पेमेंट नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे करू शकता. फी भरल्यानंतर, तुम्हाला एक टोकन क्रमांक दिला जाईल, तो प्रविष्ट करा. यानंतर तुमचा पॅन अपडेट होईल.
हे पण वाचा :- Fact Check: काय सांगता ! सरकार देत आहे एक महिन्याचा फ्री मोबाईल रिचार्ज ; जाणून घ्या सर्वकाही