PAN Card: आज आपल्या देशात अनेक सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी किंवा बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच इतर कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता आहे. मात्र कधी कधी पॅन कार्ड हरवतो. यामुळे अनेक कामात आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अवघ्या 10 मिनिटांत डुप्लिकेट पॅन कार्ड कसा बनवता येतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत डुप्लिकेट पॅन कार्ड कसा बनवू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो पॅन कार्ड हरवले असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
यासाठी सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाइट https://www.protean-tinpan.com/ ला भेट द्या.
पुढे तुम्हाला विद्यमान पॅन डेटामधील बदल/सुधारणा निवडावी लागेल.
यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये अर्जदाराला त्याचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर टाकावा लागेल.
पुढे, एक टोकन क्रमांक तयार केला जाईल जो अर्जदाराच्या ईमेलवर पाठविला जाईल.
यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स दिसतील, त्यावर क्लिक करून तुम्ही फिजिकल किंवा ई-केवायसी किंवा ई-साइनद्वारे सर्व तपशील सबमिट करू शकता.
पुढे, तुम्हाला तुमचा तपशील व्हेरिफाय करण्यासाठी NSDL कार्यालयात मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, 10वी प्रमाणपत्र इत्यादींची एक प्रत पाठवावी लागेल.
दुसरीकडे, ई-केवायसीसाठी, तुम्हाला वेबसाइटवर आधार क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर, तुम्हाला ई-पॅन किंवा फिजिकल पॅनमधून आवश्यक असलेला पर्याय निवडा.
यानंतर तुमचा पत्ता भरा आणि त्यानंतर पेमेंट करा.
भारतात राहणाऱ्यांना 50 रुपये आणि परदेशात राहणाऱ्यांना 959 रुपये भरावे लागतील.
यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसांत फिजिकल पॅन कार्ड मिळेल.
त्याच वेळी, ई-पॅन कार्ड केवळ 10 मिनिटांत उपलब्ध होईल आणि तुम्ही त्याची डिजिटल कॉपी जतन करू शकता.
हे पण वाचा :- Android Phone : फोन पासवर्ड-पॅटर्न-पिन विसरलात? तर टेन्शन नाही ; ‘या’ पद्धतीने करा फोन अनलॉक