Petrol Diesel Price : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलही महाग झाल्याने सर्वसामान्यांवर जास्तीचा आर्थिक बोजा पडत आहे.
भारतीय तेल कंपन्यांकडून रविवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा घेत झालेली नाही. सलग २७१ वा दिवस असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतंय?
देशातील प्रत्येक राज्यात आणि शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळत आहे. पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कोणत्या राज्यात?
राजस्थान मधील दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे.
गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर
मुंबई शहरामध्ये सध्या पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 प्रति लिटर दराने विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर
गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. सध्या क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल $75 आणि ब्रेंट क्रूड $81 प्रति बॅरल आहे.