भारत

हिवाळ्यात मस्तपैकी ट्रीप प्लान करा आणि गुजरातला भेट द्या! गुजरातमधील ‘ही’ ठिकाणे म्हणजे जणू स्वर्गसुखच

Tourist Places In India:- हिवाळ्यामध्ये असलेल्या मस्त थंड अशा वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रिप प्लान करून दररोजच्या त्याच त्याच रुटीन पासून काही दिवस मुक्तता मिळवून निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणे हे खूप महत्त्वाचे असते. विशेष म्हणजे अशाप्रकारे फिरायला जाण्यामुळे व्यक्ती एक प्रकारे रिचार्ज होतो व परत मोठ्या उत्साहाने आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतो.

भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर प्रत्येक राज्यामध्ये पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत व तुम्ही याकरिता कुठल्याही राज्याची निवड करू शकतात व तुमच्या आर्थिक बजेटनुसार ट्रीप प्लान करू शकतात.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील तुमच्या दैनंदिन कामातून काही वेळ काढून जर कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुमच्याकरिता गुजरात हे राज्य खूप फायद्याचे ठरू शकते.

हिवाळ्यामध्ये गुजरात येथील हवामान हे खूप उत्तम समजले जाते व त्यामुळे हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत गुजरात फिरायला जाणे खूप फायद्याचे ठरते. तुम्ही जर गुजरात फिरायला गेले तर तुम्ही या लेखात माहिती दिलेल्या स्थळांना नक्कीच भेट द्यावी. कारण या ठिकाणी भेट दिल्याशिवाय तुमची गुजरातची ट्रिप पूर्ण होऊ शकणारच नाही.

गुजरातला फिरायला जा आणि या ठिकाणांना मात्र नक्की भेट द्या

1- कच्छचे रण- तुम्ही जर गुजरात फिरायला गेले तर कच्छचे रण अवश्य पहावे. या ठिकाणी भेट देणे म्हणजे चांदण्यांच्या प्रकाशात स्वर्ग अनुभवण्यासारखे आहे. रात्रीच्या वेळी हे ठिकाण चांदण्यांच्या प्रकाशात जणू स्वर्गासारखे भासते व दरवर्षी या ठिकाणी रण उत्सव साजरा केला जातो व त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.

या ठिकाणी तुम्ही स्थानिक संस्कृती तसेच लोककला आणि पारंपारिक गुजराती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच या वाळवंटामध्ये उंटस्वारी आणि अनेक साहसी क्रीडांचा आनंद देखील तुम्हाला घेता येऊ शकतो.

या ठिकाणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये रण उत्सव आयोजित केलेला असतो. त्यामुळे तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत फिरायला गेलात तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय उत्तम असा अनुभव मिळतो.

2- गिर राष्ट्रीय उद्यान- जगातील एकमेव आशियाई सिंह यांचे निवासस्थान म्हणून गिर राष्ट्रीय उद्यानाला ओळखले जाते. गिर राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव असे आशियाई सिंहांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी भेट देणे खूप सुखदायक व आनंददायी असते.

कारण या ठिकाणी हिवाळ्याच्या कालावधीत हवामान स्वच्छ आणि चांगले असते व प्राणी निरीक्षणासाठी हा उत्तम वेळ असतो. इतकेच नाही तर या ठिकाणी तुम्ही जंगलसफारीच्या माध्यमातून विविध प्रकारचे पक्षी पाहू शकतात

तसेच बिबट्या तसेच चितळ व नीलगायसारखे अनेक प्रकारचे प्राणी देखील पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य व स्थानिक ग्रामीण जीवन तसेच गुजराती खाद्यपदार्थांची चव तुम्हाला चाखता येते.

3- स्टॅच्यू ऑफ युनिटी- आपल्याला माहित आहे की गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जातो व हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

तुम्ही जर गुजरात फिरायला गेलात तर या ठिकाणी भेट दिल्याशिवाय गुजरातची ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही. तसेच याशिवाय या ठिकाणी निसर्गरम्य असा परिसर आहे तसेच जंगल सफारी आणि फ्लॉवर व्हॅली यांचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतो.

4- सोमनाथ मंदिर- गुजरात राज्यात असलेले सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. तुम्ही जर या ठिकाणी हिवाळ्यात भेट दिली तर तुम्हाला हिवाळ्यात इथे असलेले शांत आणि थंड वातावरणाचा अनुभव घेता येतो.

या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी हा एक खूप उत्तम असा अनुभव ठरतो. या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर या ठिकाणी उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि मंदिराची भव्य दिव्यता यामुळे मनाला मोहून टाकेल असा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts