PM Kisan : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. मात्र काही शेतकऱ्यांना आता या योजनेतून मिळालेले पैसे परत करावे लागणार आहेत.
पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागणार आहेत. जर तुम्हीही अपात्र असून पैसे परत केले नाही तर तुम्हालाही जेलची हवा खावी लागणार आहे.
अनेक अपात्र शेतकरी शेतकरी योजनेचा लाभ
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. मात्र या योजनेचा देशातील अनेक अपात्र शेतकरी लाभ घेत आहेत. केंद्र सरकारकडून याबाबत एक आदेश जारी करण्यात आला आहे.
जर अपात्र असूनही तुम्ही पीएम किसान योजनेतुन पैसे मिळवले असतील तर ते पैसे परत करावे लागणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर एक सुविधा सुरु केली आहे. जर पैसे परत केले नाहीत तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल.
पीएम किसान योजनेचे पैसे कसे परत करावे
जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे चुकून मिळाले असतील किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल, तरीही तुम्हाला योजनेद्वारे पैसे मिळाले असल्यास, तुम्ही ऑनलाइन पैसे परत करू शकता.
चुकून किंवा फसवणूक करून किसान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी येथे दिलेल्या पद्धतींनुसार पीएम किसान योजना परत करू शकतात, केवळ pmkisan.gov.in पोर्टलद्वारे, शेतकरी पीएम किसान निधी योजनेचे पैसे परत करू शकतात.
किसान योजनेचे पात्र शेतकरी
भारतातील सर्व शेतकरी
ज्या शेतकऱ्यांची जमीन ५ हेक्टरपर्यंत आहे
शेती करणारा शेतकरी
जमीन शेतकऱ्याच्या नावावर असावी
शेतकरी आयटीआर आयकराच्या कक्षेत येत नाही
शेतकरी हा कोणत्याही उच्च सरकारी पदावर नाही
डॉक्टर, वकील आदींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.