PM Kisan Beneficiary List : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना ४ महिन्यांच्या अंतराने ३ हफ्त्यात दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हफ्त्याचे पैसे देण्यात आले आहेत. मात्र आता लवकरच सरकारकडून १३ वा हफ्ता दिला जाणार आहे.
तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकार या महिन्यामध्ये १३ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसानचे २ हजारे रुपये देण्यात येणार आहेत.
२०१५ साली मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योअंजनेचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे.
या योजनेची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. आता शेतकरी १३ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच त्यांना १३ वा हफ्ता मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता तपासणी
केंद्र सरकारकडून या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता तपासणी केली जात आहे. कारण या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहेत.
या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पैसे
ज्या लोकांची मासिक पेन्शन 10000 च्या वर आहे.
जे लोक सरकारी कर्मचारी आहेत.
ज्यांनी यापूर्वी कोणतेही संवैधानिक पद भूषवले आहे.
आयकर भरणारे.
डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत.
सर्व संस्थात्मक जमीनधारक.
लाभार्थी यादी
केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी १३ व्या हफ्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या गावातील लाभार्थी शेतकर्यांची यादी डाउनलोड करू शकता आणि या यादीत तुमचे नाव देखील तपासू शकता.