अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना चा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसला असून त्यांची लोकप्रियता घातली आहे.
अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात मोदींचे गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. गुणांकनात घट झालेली असली तरी अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांनि मोदी यांनी मागे टाकलं आहे.
या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवलं आहे.
यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ६६ टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचा क्रमांक आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ५३ टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत. २०१९ मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा हे गुणांकन ८२ टक्के होतं.
इतर नेत्यांचशचे गुणांकन –