PMKVY Scheme : केंद्र सरकारकडून देशातील शेतकरी, महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचा देशातील लाखो नागरिकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारकडून बरोजगार तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरु केली आहे.
जर तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर केंद्र सरकारकडून एक योजना सुरु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोफत प्रशिक्षण आणि नोकरी देखील दिली जात आहे.
तुम्हीही प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो तुम्ही घरबसल्या करू शकता.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2023
मोदी सरकारकडून २०१५ मध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरु केली आहे. आतापर्यंत या योजनेचे एकूण ३ टप्पे पूर्ण झाले आहेत. तुम्हीही बेरोजगार असाल तर प्रधानमंत्री कौशल विकास योजनेमार्फत दिले जाणारे प्रशिक्षण घेऊन तुम्ही नोकरी मिळवू शकता. योजनेंतर्गत युवकांना त्यांच्या आवडीनुसार ४० विविध क्षेत्रात मोफत प्रशिक्षण दिले जाते. दहावी उत्तीर्ण झालेले तरुण या योजनेत अर्ज करू शकतील.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे उद्दिष्ट
देशात बेरोजगारी वाढत चालली आहे. तसेच कोरोनाकाळापासून अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असेच अनेक तरुण आणि पदवी शिक्षण पूर्ण केलेले अनेक तरुणांकडे नोकऱ्या नाहीत.
त्यामुळे आणखीनच बेरोजगारी वाढत चालली आहे. अशा बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी केंद्र सरकारकडून तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळवून देणे हा प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पीएम कौशल विकास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
सक्रिय मोबाइल नंबर
पासपोर्ट साइज फोटो इ.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY 4.0 वर नोंदणी कशी करावी
PMKVY साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम PM कौशल विकास योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल.
मुख्यपृष्ठावर, तुम्हाला PMKVY 4.0 ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
PMKVY 4.0 नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि “सबमिट” वर क्लिक करा.