Portable AC Offer : भारतात सध्या अनेक राज्यांमधील उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उष्णता वाढल्याने अनेकजण कुलर किंवा एसी खरेदी करण्याकडे धाव घेत आहेत. या दिवसांमध्ये अशा उपकरणांच्या किमती वाढतात. त्यामुळे अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.
तुम्हीही स्वस्तात एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण आता तुम्ही देखील 2 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये एसी खरेदी करू शकता. तसेच हा एसी तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकता.
आज तुम्हाला पोर्टेबल एसीबद्दल सांगणार आहोत. हा एक असा एसी आहे जो तुम्ही प्रवासात देखील सहज घेऊन जाऊ शकता. ज्याची किंमत देखील कमी आहे. आणि वजनाला देखील हा एसी खूपच हलका आहे.
पोर्टेबल मिनी एसी
फ्लिपकार्टकडून या पोर्टेबल मिनी एअर कंडिशनरवर २५ टक्के सूट दिली जात आहे. हा 500ML पोर्टेबल एसी आहे. फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात असल्याने पैशांची आणखी बचत होत आहे.
फ्लिपकार्टवर या एसीची किंमत 1,999 रुपये आहे. पण या एसीवर फ्लिपकार्टकडून 25 टक्के सूट देण्यात येत असल्याने ग्राहकांना हा एसी 1490 रुपयांना मिळत आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही एसी खरेदी केल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल.
या मिनी पोर्टेबल एसी काही वेळात तुमची खोली थंडगार करू शकते. तुम्ही हा एसी खोलीमध्ये वापरू शकता. तसेच प्रवासात देखील तुम्ही या पोर्टेबल मिनी एसीचा वापर करू शकता.
2000 अंतर्गत मिनी एअर कंडिशनर्स
अॅमेझॉनद्वारे तुम्ही मिनी कुलर खरेदी करू शकता. येथे त्याच्या किमतीवर 43 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. सवलतीनंतर तुम्ही एअर कूलर 2,999 रुपयांऐवजी 1,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
सिंक ट्रेडर्स-मिनी एअर कूलर
तुम्हालाही एअर कुलर खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील तो स्वस्तात खरेदी करू शकता. सिंक ट्रेडर्स-मिनी एअर कूलरची किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्ही हा कुलर Amazon वरून खरेदी केला तर तो तुम्हाला 2,499 रुपयांना मिळेल. हा कुलर काही क्षणात तुमची खोली थंडगार करेल.