Steel and Cement Rate : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. मात्र जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत.
प्रत्येकाचे स्वतःचे छोटे का होईना घर बांधण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे आजही अनेकजण कच्च्या घरात राहत आहेत. मात्र आता पक्के घर बांधण्याची एक चांगली संधी आहे.
सध्या स्टील आणि सिमेंटची मागणी कमी आहे. कारण बांधकाम क्षेत्रात मंदी जाणवत आहे. त्यामुळे स्टील आणि सिमेंटचे भाव देखील उतरत आहेत. मात्र लवकरच स्टील आणि सिमेंटचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण बांधकाम क्षेत्रात स्टील आणि सिमेंटची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.
स्टीलच्या दरांमध्ये बदल
दिवसेंदिवस स्टीलच्या दरामध्ये बदल होत आहे. स्टीलच्या मागणीत घट होत असल्याने किमतीही कमी होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी स्टीलचे दर प्रति टन 70000 रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र सध्या स्टीलचे दर खूप कमी झाले आहेत.
स्टीलची किंमत
देशात अनेक कंपन्यांचे स्टील उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीनुसार स्टीलचे दर बदलत राहतात. सध्या स्टीलचे दर प्रति टन सुमारे 65000 रुपयांच्या आसपास सुरु आहेत.
देशातील प्रमुख शहरांमध्ये स्टीलच्या किंमत
मुंबई महाराष्ट्र 48400 रुपये प्रति टन 2-मार्च-2023
जालना महाराष्ट्र 48700 रुपये प्रति टन 2-मार्च-2023
चेन्नई तामिळनाडू 49600 रुपये प्रति टन 2-मार्च-2023
कोलकाता पश्चिम बंगाल इंगॉट 46200 रुपये प्रति टन 2-मार्च-2023
सिमेंटची ब्रँडनिहाय किंमत
अल्ट्राटेक सिमेंट 330 रुपये प्रति बॅग
एसीसी सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट 410 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट 350 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट 330 रुपये प्रति बॅग