भारत

Ration Card News : रेशन कार्ड धारकांनो सावधान! ही चूक केल्यास भरावा लागणार दंड, जाणून घ्या सविस्तर

Ration Card News : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील गरीब नागरिकांना रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब नागरिकांना कमी दरात धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून रेशनच्या नियमांमध्ये बदल केला जात आहे.

कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील रेशन धारकांसाठी मोफत रेशन वाटप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच या योजेनची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मात्र आता मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. जे लोक चुकीच्या पद्धतीने मोफत रेशनचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे.

शासनाने गरजू कुटुंबांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली. त्याअंतर्गत सरकारकडून प्रति व्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. मात्र सरकारने मोफत रेशनसाठी काही पात्रता ठेवली आहे. त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मात्र काही काळापासून शासनाकडे लोक पात्र नसतानाही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आता सरकार अशा लोकांवर बळाचा वापर करत आहे. आणि आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ही आहे सरकारची पात्रता! या योजनेसाठी पात्रता नसल्यास काय करावे?

सरकारकडून देशातील गरीब आणि गरजू कुटुंबासाठी रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेमध्ये अनेक अपात्र लोक देखील आहेत. तेही सरकारने सुरु केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत.

मात्र सरकारकडून रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबाकडे 5 एकर जमीन आहे, घरात कार, ट्रॅक्टर, AC आहे, कुटुंबाचे उत्पन्न 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील नागरिकांना रेशन योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जर तुमच्याकडे ही सर्व साधने आणि सुविधा आहेत, तरीही तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर आताच तुमचे नाव रेशन योजनेतून काढून टाका, कारण आता अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts