Reliance Enter Car Market : देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ टेलिकॉम क्षेत्रामध्ये देखील नशीब आजमावले आहे. टेलिकॉम क्षेत्रामध्ये देखील रिलायन्स इंडस्ट्रीजने चांगली कमाई केली आहे.
आता रिलायन्स इंडस्ट्री ऑटो क्षेत्रामध्ये देखील नशीब आजमावणार आहे. आता लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीज ऑटो क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे. लवकरच रिलायन्स एमजी मोटर इंडियाचा स्टॉक खरेदी करणार असल्याची माहिती मिळणार आहे.
चीनच्या SIAC मोटरच्या मालकीची कंपनी MG Motor भारतीय बाजारपेठेतील आपला बहुतांश हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील संबंध बिघडले आहेत त्यामुळे एमजी मोटर भारतातील हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो ग्रुप, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि जेएसडब्ल्यू ग्रुप सारख्या कंपन्याकडून एमजी मोटरला इंडियामधील हिस्सा खरेदी करण्याची आशा आहे. या वर्षीच्या अखेरीस रिलायन्सकडून यावर शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो.
एमजी मोटरने भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच पैसे गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी मागितली आहे मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळलेली नाही. त्यामुळे आता एमजी मोटरने भारतीय संस्थांमार्फत भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
एमजीचा गुजरातच्या हलोलमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, जेथे दरवर्षी 1.2 लाख कार तयार करण्याची क्षमता आहे. नजीकच्या भविष्यात, हलोल येथे अॅड-ऑन प्लांट उभारण्याची योजना आहे, त्यानंतर उत्पादन क्षमता वार्षिक 3 लाख युनिट्स होण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमजी मोटर येत्या २-४ वर्षांमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याची योजना आखत आहे. त्यामुळे कंपनीला गुंतवणूकदार हवा आहे. यामुळे एमजी मोटर रिलायन्स इंडस्ट्रीज, हिरो ग्रुप, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि जेएसडब्ल्यू ग्रुपकडे पाहत आहे.
MG Motor ने नुकतीच त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV सादर केली आहे. या कारची किंमत 7.98 लाख रुपये आहे. सध्या MG Motor भारतीय ऑटो मार्केटमध्ये पाच ते सहा कार विकत आहे.
तसेच MG Motor आता आगामी काळात चार ते पाच कार लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. एमजी मोटर इंडियाने 2028 पर्यंत त्यांचे कर्मचारी संख्या 20,000 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.