अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-भारतीय जनता पक्ष हा आपल्या हिंदुत्वाच्या मुद्या साठी जाणला जातो. भारतीय जनता पक्ष हा आपल्या इतर पक्षांना सुद्धा हिंदुत्वाचे धडे देत असतो . हे वेळोवेळी त्यांच्या नेत्यांनी केलेल्या कृतींमुळे अथवा वक्तव्यांमुळे दिसून येते.
आता भारतीय जनता पक्षाचे साक्षी महाराज यांना एक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी ओवेसींच्या उंगल्या सुद्धा हिंदुत्वात बुडाल्या आहे असे विचित्र वक्तव्य केले आहे.
ओवेसी साहेबांची भाजपनेच पोल खोल केल्याने आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे. ओवेसी हे मुस्लिम धर्मियांसाठी तारणहार व मोठे नेते आहेत. परंतु ते भाजपाची एक शाखा व अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्या.
पण भाजपचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून सांगितले आहे कि “होय,ओवेसी हे आमच्या पक्षाला मदत करत असतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही बिहार जिंकले”. आता पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा ते आम्हाला मदत करतील.
सामनाच्या अग्रलेखातून या संदर्भात भारतीय जनता पक्ष यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले आहेत. भारतीय जनता पक्ष जर ओवेसी सारख्या लोकांची मदत जर घेत असलं
तर आम्ही कसे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी आहोत असले ‘टेम्भे’ यापुढे मिरवू नयेत. ओवेसी हि त्यांची गुप्त शाखा आहे असे त्यांनी खुलेआम स्पष्ट करावे असे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. भाजपकडून आता याला काय उत्तर येणार याकडे उत्सुकता लागली आहे.