Sandeep Maheshwari : जर तुम्हीही सोशल मीडियाचा वापर करत असाल किंवा युट्युबवर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्हिडीओ वॉर बाबत नक्कीच ऐकल असेल. संदीप माहेश्वरी हे एक प्रसिद्ध youtuber आहेत सोबतच ते एक लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत आणि विवेक बिंद्रा हे देखील एक प्रसिद्ध youtuber आहेत, सोबतच ते बडा बिजनेस कंपनीचे सीईओ आहेत.
दरम्यान, संदीप माहेश्वरी यांनी नऊ दिवसांपूर्वी त्यांच्या यूट्यूब चैनलवर बिग स्कॅम एक्सपोज असे शीर्षक असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरी यांनी कोणाचेही नाव न घेता एका स्कॅमचा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ युट्युबवर आल्यानंतर आतापर्यंत जवळपास 5.2 मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. यामध्ये त्यांनी मल्टी लेवल मार्केटिंगबाबत भाष्य केले होते.
हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर सर्व सोशल मीडियामध्ये याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी म्हणजेच व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर विवेक बिंद्रा यांनी यावर आक्षेप घेतला. बिंद्रा यांनी माहेश्वरी यांना जर सर्वसामान्य प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर ते पुन्हा एकदा संदीप माहेश्वरी यांच्या शो मध्ये जाऊन त्याच्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
तर दुसरीकडे माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्यावर धमकावण्याचा आरोप लगावला आहे. खरेतर संदीप माहेश्वरी यांनी नऊ दिवसांपूर्वी पब्लिश केलेल्या व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रा यांचे प्रत्यक्ष नाव घेण्यात आलेले नव्हते. मात्र अप्रत्यक्षरीत्या त्यांनी विवेक बिंद्रा यांनाच टार्गेट केले होते. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नाव न घेता बडा बिजनेसच्या स्कॅम बाबत माहिती दिली होती. दरम्यान काल संदीप माहेश्वरी यांनी पुन्हा एक नवीन व्हिडिओ पब्लिश केला आहे.
या व्हिडिओत त्यांनी ओपनली विवेक बिंद्रा यांचे नाव घेतले आहे. शिवाय विवेक बिंद्रा यांचा बिझनेस मॉडेल कशाप्रकारे स्कॅम आहे हे त्यांनी आपल्या प्रेक्षकांना पटवून सांगितले आहे. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्या डॉक्टरेटबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच या व्हिडिओत त्यांनी काही मुलांचे व्हिडिओज देखील दाखवले आहेत जे की विवेक बिंद्रा यांच्या बडा बिजनेसवर आरोप करीत आहेत.
संदीप माहेश्वरी यांनी या व्हिडिओमध्ये बिंद्रा यांची डिग्री फेक असल्याचा आरोप केला. ते म्हटलेत की, ही डिग्री इंडिया युके अमेरिका येथून नाही घेतलेली तर ते आपल्या शेजारील राष्ट्र श्रीलंकेतून मिळवलेली आहे. याशिवाय माहेश्वरी यांनी भारतीय कायद्याने अशा प्रकारचा बिजनेस म्हणजेच जसा बिझनेस विवेक बिंद्रा चालवत आहेत अशा प्रकारचा बिजनेस करणे प्रतिबंधित आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये काही आरबीआयचे आणि भारत सरकारचे सर्क्युलर देखील उपस्थित ऑडियन्सला दाखवली.
याशिवाय त्यांनी विवेक बिंद्रा यांच्या या बिझनेसमुळे जे लोक ठगले गेले आहेत त्यांच्यासाठी आता त्यांच्या यूट्यूब चैनल वर मोनेटायझेशन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर संदीप माहेश्वरी यांच्या चैनल वर गुगलच्या ऍड दिसत नाहीत. म्हणजेच त्यांनी त्यांचा चैनल मॉनिटाईज केलेला नाही. पण आता विवेक बिंद्रा यांच्या बिझनेसमुळे ज्या लोकांची ठगी झाली आहे त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या चैनल वर मोनेटायझेशन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणजे आता या चैनलवरून जी इन्कम होईल ती इन्कम ते या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरणार आहेत. याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना #StopVivekBindra हे हॅशटॅग देखील अधिका-अधिक व्हायरल करावे असे आवाहन केले आहे. एकंदरीत आता संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा असे हे प्रकरण झाले असून आता माहेश्वरी यांनी बिंद्रा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.