Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : सध्या युट्युबर आणि प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्रा या दोघांमध्ये मोठे घमासान सुरू आहे. संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चैनलवर बिझनेस मास्टरी नावाची विनामूल्य मालिका सुरु केली आहे. यामध्ये ते बिझनेस रिलेटेड व्हिडिओज पोस्ट करत आहेत.
दरम्यान, याच मालिकेतील एका ताज्या व्हिडिओमध्ये त्यांनी दोन मुलांशी गप्पा मारल्या आहेत. यात सहभागी झालेल्या त्या दोन मुलांनी प्रसिद्ध YouTuber वर गंभीर आरोप लावले असेल. या दोन मुलांनी एका प्रसिद्ध youtuber च्या कोर्समध्ये सहभागी होऊन त्यांना कसे नुकसान सहन करावे लागले याबाबत माहिती दिली आहे. यावेळी एक मुलगा म्हणतो, ‘व्यावसायिकांच्या ऐवजी सेल्समन तयार करत आहेत.’
तिथे फक्त मन डायवर्ट केले जात आहे. त्यांना फक्त त्यांचे उत्पादन विकायचे आहे. येथे गेल्यावर आधी लोकांना सांगतात की, तुम्ही नक्कीच बिझनेसमन व्हाल. पण असे काही होत नाही. 50,000 रुपये भरून कोर्स केला. मग हेच उत्पादन म्हणून इतरांना विकावे लागते. या गोष्टीलाच तर मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणतात. त्यानंतर दुसरा मुलगा ३५ हजार रुपये देऊन कोर्स घेतल्याचे सांगतो.
यामध्ये विविध स्तर आहेत. 10 लाख, 1 लाख रुपयांपर्यंतचे कोर्सेस आहेत. यामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. 35 हजार रुपये देऊनही एक रुपयाही कमावला नसल्याचे तो सांगतो. तो म्हणतो की एक मोठा YouTuber एक कोर्स चालवतो. यात जो उत्पादन दुसऱ्याला विकतो त्याला कमिशन मिळते. तसेच तो मुलगा सांगतो की खरेतर, आई-वडिलांना काही नातेवाईकांनी आधीच ही गोष्ट सांगितली होती.
पण कोर्स केल्यानंतर त्याला या खेळाची माहिती झाली. खोटे बोलून ग्राहकाची फसवणूक केली जाते. मुलगा म्हणतो की, ‘आम्हाला सांगण्यात आले आहे की तुम्ही 35,000 रुपये काय बघता, ते 1 लाख रुपये बघत नाहीत जे तुम्ही कमवू शकता.’ येथे विद्यार्थी टार्गेट केले जात आहेत. मग त्याच्याकडे दोन पर्याय आहेत, एकतर त्याचे पैसे सोडून द्या किंवा आणखी लोकांना त्यात सामील करा.
विडिओमध्ये कोणाचेच नाव घेतलेले नाही
संदीप माहेश्वरी यांच्या या व्हिडिओत कोणाचेच नाव घेण्यात आलेले नाही. मात्र हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर विवेक बिंद्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. यावरून या व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रा यांच्या बडा बिजनेस बाबतच हा विडिओ होता हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्यावर व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव बनवला जात आहे असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे विवेक बिंद्रा यांनी देखील या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हटले की, “संदीप माहेश्वरी यांनी पुन्हा मला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करावे, तिथे जर दर्शकांच्या मनात काही प्रश्न असतील तर मी त्यांचे उत्तर देईल.”