Post Office Scheme : तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक लहान मोठ्या योजना आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो कमवू शकता.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत तुम्ही ३००० हजार रुपये गुंतवून १० लाख मुळवू शकता. यासाठी तुम्हाला दररोज १०० रुपये वाचवावे लागतील. महिन्यात ३००० हजार रुपये तुम्हाला या योजनेत गुंतवावे लागतील.
पोस्ट ऑफिसच्या शाखा देशातील प्रत्येक शहरात तसेच गावात आहेत. आता पोस्ट ऑफिसमध्येही इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू झाली आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते.
कारण भारतीय पोस्ट ऑफिस हे भारत सरकार चालवते. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक बुडण्याची भीती नाही. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेत 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
अशा प्रकारे तुम्हाला 15 वर्षात 10 लाख मिळतील
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला 100 रुपये वाचवले आणि मासिक PPF स्कीममध्ये 3000 रुपये गुंतवले तर 15 वर्षांत तुमच्याकडे 9,76,370 रुपयांचा निधी असेल.
दरमहा 3 हजार रुपये नुसार, तुम्हाला एका वर्षात एकूण 36 हजार रुपये जमा करावे लागतील, जे 15 वर्षांत 5,40,000 रुपये होतील.
तुम्हाला या रकमेवर ७.१% दराने व्याज मिळेल, जे १५ वर्षांत ४,३६,३७० रुपये होईल.
या प्रकरणात, तुमच्याकडे व्याज आणि मुद्दल यांचा समावेश करून १५ वर्षांत एकूण ९,७६,३७० रुपयांचा निधी असेल.