School News : येणाऱ्या काही दिवसात 2023 चा फेब्रुवारी महिना देखील संपणार असून मार्च महिना सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या मार्च महिन्यात अनेक नियम देखील बदलणार असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे तर दुसरीकडे मार्च 2023 मध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मार्च 2023 मध्ये विद्यार्थ्यांना शनिवार-रविवारसह सणांमुळे अनेक सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. हे लक्षात ठेवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सण असले तरी त्यानुसार शाळा बंद राहतील. या यादीत महिन्याच्या दुसऱ्या शनिवार व्यतिरिक्त उर्वरित 3 शनिवार सुट्टी ऐच्छिक आहे. अनेक शाळा आठवड्यातून दोन दिवस शनिवार-रविवार बंद राहतात.काही शाळा फक्त रविवारी बंद असतात.
रविवारमुळे 5 मार्चला शाळेला सुट्टी असणार आहे. 8 मार्च हा बुधवार असून त्याच दिवशी होळीचा सण असल्याने शाळा बंद राहणार असून त्यानंतर 11 मार्च हा दुसरा शनिवार असल्याने अनेक शाळांना सुट्टी असणार आहे. 12 मार्च तो म्हणजे रविवार तर 19 मार्च रविवारशिवाय 23 मार्चला शहीद दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये सुट्टी असू शकते. तसेच 26 मार्च हा रविवार आहे. रामनवमीनिमित्त 30 मार्च रोजी शाळा बंद राहणार आहेत. अशा स्थितीत मार्च महिन्यात अनेक दिवसांच्या सुटीचा लाभ मुलांना मिळणार आहे.
मार्चमधील सुट्ट्यांची यादी
03 मार्च – शनिवार
04 मार्च – रविवार
07 मार्च – होळी दहन
08 मार्च- होळी
11 मार्च – दुसरा शनिवार
12 मार्च – रविवार
18 मार्च – शनिवार
19 मार्च – रविवार
23 मार्च – शहीद दिन
25 मार्च – शनिवार
26 मार्च – रविवार
30 मार्च – राम नवमी
हे पण वाचा :- DA Hike 2023 : ‘या’ कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा ! पगारात होणार तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ ; वाचा सविस्तर