भारत

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करणार? नेमकं काय आहे प्रकरण…

Shahid Afridi : सध्या पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. असे असताना भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे.

यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शाहीद आफ्रिदी यासाठी पुढाकार घेणार असून तो मोदींना विनंती करणार आहे. स्वत: शाहीद आफ्रिदीने हे म्हटले आहे. दोहा येथे लिजेंडस लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होती. तिथे बोलताना शाहीद आफ्रिदीने ही माहिती दिली आहे.

असे असताना आशिया कप स्पर्धा कुठे होणार? ते अजून नश्चित झालेलं नाही. बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये यावरुन वाद रंगला आहे. आशिया कप टुर्नामेंटवरुन दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आहेत.

त्यावरुन नाटय रंगलेले आहे. आता यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने उडी घेतली आहे. यामुळे आता वाद मिटणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही देशामध्ये क्रिकेट सुरु व्हावं, यासाठी मी मोदी साहेबांना विनंती करेन, असे लिजेंडस लीग क्रिकेट खेळायला आलेले शाहीद आफ्रिदी म्हणाला.

दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट संबंध सुरळीत व्हावेत, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहोत, असे शाहीद आफ्रिदीने म्हटले आहे. यामुळे आता आफ्रिदी मोदींना फोन करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts