Summer Car Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकजण कार घेऊन लांबचा प्रवास करत असतात. तसेच उष्णता जास्त असल्याने अनेकदा कारचे इंजिन देखील अधिक गरम होत असते. त्यामुळे कारचे तापमान देखील सतत वाढत असते. पण अनेकदा अनेकांच्या कार उन्हाळ्यामध्ये बंद पडत असतात.
उन्हाळ्यामध्ये अनेकांच्या कारबाबत समस्या निर्माण होत असतात. तसेच जास्त उन्हामुळे कार इंधन देखील अधिक खर्च करत असते. इंजिन अधिक गरम झाल्याने कार सतत अधिक इंधन खर्च करत असते.
गाडीचे इंजिन अधिक गरम झाल्याने गाडीमध्ये वेगळा दुर्गंध येतो. तसेच कारचे इंजिन अधिक गरम झाल्याने कार अचानक कधीही रस्त्यामध्ये बंद पडू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कारबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही कारने प्रवास करणार असाल तर तुम्ही नेहमी कारमध्ये दोन गोष्टी तपासल्या पाहिजेत त्या म्हणजे कूलंट आणि रेडिएटर. या गोष्टी तपासूनच तुम्ही उन्हाळ्यामध्ये कारचा प्रवास करा. अन्यथा तुमची कार कधीही अचानक बंद पडू शकते.
रेडिएटर फॅनने व्यवस्थित काम केले पाहिजे
कार चालू केल्यानंतर तसेच थोड्या प्रवासानंतर कारचे इंजिन थोडे गरम होणे हे सहाजिकच आहे. पण जात उन्हाळ्यामध्ये तुमची कार अधिकच गरम होत असेल तर लवकरच सावध होणे गरजेचे आहे. कारचे तापमान अधिकच वाढत असेल तर तुम्ही कारचा रेडिएटर तपासून पहा.
रेडिएटर फॅन व्यवस्थित काम करत आहे की नाही देखील मेकॅनिकलकडून तपासून घ्या. जर तुम्ही कारचे इंजिन अधिक गरम होत असेल आणि दुर्लक्ष केले तर तुम्हाला जास्तीचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
कूलंट इंजिनला गंजण्यापासून देखील प्रतिबंधित करते
कारचे इंजिन जर अधिक गरम होऊ नये यासाठी कूलंट काम करत असते. जर कार अधिक गरम होत असेल तर कूलंट इंजिन थंड करण्याचे काम करत असते. तसेच इंजिनला गंज लागू नये यासाठी देखील कूलंट काम करत असते. इंजिनमधील जुने अँटीफ्रीझ अवशेष काढून टाकते.
कूलंट म्हणजे काय आणि कसे तपासायचे
कूलंट दिसायला हिरव्या कलरचा असतो. तसेच तुम्ही अनेकदा तो पाहिलाही असेल. जेव्हा तुमची कार अधिक गरम होते तेव्हा तेव्हा ती थंड करण्याचे काम कूलंट करत असतो. तसेच तुमच्या कारचे इंजिन हळूहळू झिजणे सुरु होते मात्र कूलंट कारचे इंजिन झिजणे कमी करते आणि इंजिनमधील जुने अँटीफ्रीझ अवशेष काढून टाकते.