Summer Vacation Planning : तुम्हालाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचे आहे आणि तुम्ही देखील प्लॅनिंग करत असाल तर तुमच्याकडे सर्वात प्रथम सहलीचे प्लॅनिंग आगोदरच केलेले असले पाहीजे, अन्यथा तुम्ही सहलीला गेल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाणार असाल तर तुम्ही अगोदर प्लॅनिंग करून घ्या. तसेच तुम्हाला कोणत्या ठिकाणी फुरायला जायचे आहे हे देखील अगोदरच ठरवून घ्या. तसेच त्या पर्यटन ठिकाणांबद्द्दल माहिती जाणून घ्या.
पर्यटनाची ठिकाणे ठरवा
सर्वात पर्थम तुम्ही उन्हाळ्यामध्ये फिरायला जाणार असाल तर थंडगार हवा असणारी पर्यटन स्थळे तुम्हाला शोधावी लागतील. भारतात तुम्ही प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट देऊ शकता. तसेच ज्या ठिकाणी जाणार आहात त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा आहेत की नाहीत हे देखील पहा.
तुम्हाला कोणत्या ठिकाणी फिरायला जाणे आवडते हे देखील महत्वाचे आहे. त्यानुसार तुम्ही समुद्रकिनारे, पर्वत आणि नैसर्गिक सौदर्य असलेली ठिकाणे निवडू शकता.
तसेच तुम्हाला फिरायला जाताना शक्य असल्यास गर्दीच्या वेळी फिरायला जाणे टाळावे. त्यामुळे तुमची सहल चांगली होऊ शकते. तसेच तुम्ही फिरायला जाताना ट्रेन आणि फ्लाइटचे बुकिंग करावे. यासाठी तुम्हाला अगोदरच बुकिंग करावे लागेल. फ्लाईट तिकीट बुकिंग करताना ऑफर जाणून घ्या त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते.
राहण्याची व्यवस्था अगोदरच करा
तुम्हीही फिरायला चालला असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे राहण्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला हॉटेल्स आणि इतर ठिकाणी राहण्याची सोय करणे गरजेचे आहे.
ऑनलाईन वेबसाईटवरून तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता. तसेच ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहे त्याच्या आसपासच राहण्यासाठी हॉटेल्स बुक करा. त्यामुळे तुम्ही सहज पर्यटन ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
तसेच फिरायला जाण्यासाठी तुम्हाला किती दिवस फिरायला जायचे आहे हे अगोदर ठरवून घ्या. त्यांनतर तुम्ही त्या दिवसांचे लागणारे सामान घेऊन जावे. त्यामुळे तुम्हाला काहीही खरेदी करावे लागणार नाही.
तसेच तुमच्या बजेटनुसार तुम्ही पर्यटन ठिकाणे निवडा. कारण अनेकदा फिरायला गेल्यानंतर तुमचे बजेट फसू शकते. त्यामुळे सर्वात पर्थम तुम्हाला ठिकाणे निवडावी लागतील.