Surya Nutan Price : देशात वाढत असणाऱ्या महागाईमुळे आज स्वयंपाकाचा गॅसही महाग झाला आहे. यामुळे गॅस खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज बाजारात 14.2 किलो LPG गॅस सिलेंडरची किंमत 1,050 रुपये तर दुसरीकडे वीज देखील महाग होत आहे. सध्या प्रति युनिट विजेचा खर्च 10 ते 12 रुपये इतका येत (भारतात) आहे.
यामुळे आज आम्ही तुम्हाला एका खास प्रकारचा स्टोव्हबद्दल माहिती देणार आहोत ज्याचाफायदा घेऊन तुम्ही आयुष्यभर फ्रीमध्ये अन्न शिजवू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि हा एक सोलर स्टोव्ह आहे ज्याचा नाव सूर्या नूतन आहे आणि हे बाजारात केंद्र सरकारने आणला आहे. या सरकारी स्टोव्हची किंमत सुमारे 12 हजार रुपये आहे. साधारणपणे एकरकमी 12,000 रुपये ही मोठी रक्कम असते. पण चांगली गोष्ट अशी आहे की एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर अन्न फुकटात शिजवता येते.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी तेल कंपनीने सूर्य नूतन स्टोव्ह लॉन्च केला आहे. सौर स्टोव्ह भारतात आधीच अस्तित्वात आहेत. पण सूर्य नूतन हा पूर्वीच्या सौर स्टोव्हपेक्षा वेगळा आहे, कारण हा स्टोव्ह दिवसा तसेच रात्री वापरता येतो. तसेच, स्वयंपाकघरात ते ठेवणे सोपे आहे. सूर्य नूतन स्टोव्ह इंडियन ऑइलच्या फरीदाबाद संशोधन आणि विकास केंद्रात बनवला जातो. सूर्या नूतन स्टोव्हचे पेटंट इंडियन ऑइल कंपनीकडे आहे.
सूर्या नूतन हा सोलर रिचार्जेबल स्टोव्ह आहे. तुम्ही स्प्लिट एसी सह सोलर स्टोव्ह लावू शकाल. यातील एक युनिट उन्हात ठेवावे लागते तर दुसरे युनिट स्वयंपाकघरात बसवावे लागते. येत्या काही दिवसांत उन्हाळा सुरू होणार आहे. त्याआधी घरात सूर्यनूतन स्टोव्ह बसवावा आणि हजारो रुपयांची बचत करा.